birthday of shriniwas patil | Sarkarnama

आजचा वाढदिवस : श्रीनिवास दादासाहेब पाटील, माजी राज्यपाल

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

यशस्वी सनदी अधिकारी ते लोकसभेतील खासदार आणि सिक्कीमचे राज्यपाल अशी त्यांची कारकीर्द बहरत गेली. त्यांचे शिक्षण एम ए, एल एलबी आहे. सिक्कीम विद्यापीठाने त्यांना डॉक्‍टर ऑफ सायन्स ही पदवी दिली आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून श्रीनिवास पाटील हे उपजिल्हाधिकारी झाले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर, वर्धा, नगर जिल्ह्यात प्रांताधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदी पदांवर काम करून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यानंतर 1979 ला त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती मिळाली.

यशस्वी सनदी अधिकारी ते लोकसभेतील खासदार आणि सिक्कीमचे राज्यपाल अशी त्यांची कारकीर्द बहरत गेली. त्यांचे शिक्षण एम ए, एल एलबी आहे. सिक्कीम विद्यापीठाने त्यांना डॉक्‍टर ऑफ सायन्स ही पदवी दिली आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून श्रीनिवास पाटील हे उपजिल्हाधिकारी झाले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर, वर्धा, नगर जिल्ह्यात प्रांताधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदी पदांवर काम करून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यानंतर 1979 ला त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती मिळाली. त्यानंतर त्यांनी बीड, पुणे जिल्हाधिकारी, पिंपरी महापालिकेचे आयुक्त, नागपूर चे उपआयुक्त, आदिवासी विकास नाशिकचे उपआयुक्त, नागपूर सुधार प्रन्यासाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. 1999 मध्ये त्यांनी प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि ते कॉंग्रेसचे क्रियाशील सदस्य झाले. त्याच दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. पहिल्याच वर्षी ते कराडचे खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर दुसऱ्यांदा कराडचे खासदार झाले. त्यावेळी त्यांनी सर्वाधिक मते घेतली होती. त्यानंतर "राष्ट्रवादी' च्या नियोजन व विकास विभागाचे उपाध्यक्ष होते. 2013 मध्ये ते सिक्कीमचे राज्यपाल झाले. ते 2018 पर्यत त्यांनी या पदावर काम केले. सेवानिवृत्ती नंतर त्यांनी पुन्हा सामाजिक व राजकीय क्षेत्रात कामास सुरवात केली आहे.  

 
 

संबंधित लेख