birthday of ram shinde | Sarkarnama

आजचा वाढदिवस : राम शिंदे, भाजप, जलसंधारण व राजशिष्टाचारमंत्री

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 1 जानेवारी 2019

कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे सदस्य, राज्याचे मृद- जलसंधारण व राजशिष्टाचारमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत बाजी मारून विधानसभेत अभ्यासू सदस्य म्हणून आपले स्थान बळकट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात सर्वांत जास्त कामे मिळवून मागील अनेक वर्षांचा बॅकलॉग भरून काढल्याची भावना या मतदारसंघात झाली आहे. जामखेड नगरपालिकेची सत्ता आपल्या ताब्यात ठेवून राजकीय घडी बांधण्यात शिंदे यशस्वी झाले.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे सदस्य, राज्याचे मृद- जलसंधारण व राजशिष्टाचारमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत बाजी मारून विधानसभेत अभ्यासू सदस्य म्हणून आपले स्थान बळकट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात सर्वांत जास्त कामे मिळवून मागील अनेक वर्षांचा बॅकलॉग भरून काढल्याची भावना या मतदारसंघात झाली आहे. जामखेड नगरपालिकेची सत्ता आपल्या ताब्यात ठेवून राजकीय घडी बांधण्यात शिंदे यशस्वी झाले. कुकडीचे पाणी, जिल्ह्यातील महामार्गाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नगर महापालिका निवडणुकीत कमी जागा असतानाही भाजपचा महापौर व उपमहापौर करण्यात प्रा. शिंदे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे मुख्यमंत्री दरबारी त्यांचे वजन वाढले. 

संबंधित लेख