birthday of raksha khadase | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

आजचा वाढदिवस : रक्षा निखिल खडसे खासदार,रावेर (जळगाव)

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 मे 2018

भारतीय जनता पक्षाच्या रावेर लोकसभा मतदार संघातील खासदार . चौदाव्या लोकसभेतील त्या व हीना गावित सर्वांत युवा (वय 26) सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या त्या स्नुषा आहेत. सासरी आल्यानंतर सन 2010 मध्ये त्यांनी मुक्ताईनगर (जि.जळगाव) येथील ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून त्या विजयी झाल्या. ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी राजकीय जीवनास सुरवात केली. याच वर्षी त्या मुक्ताईनगरच्या सरपंच झाल्या. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्या झाल्या, शिक्षण समितीचे सभापतिपदही त्यांना मिळाले. शिक्षण समिती सभापती असताना त्यांनी आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटविला होता.

भारतीय जनता पक्षाच्या रावेर लोकसभा मतदार संघातील खासदार . चौदाव्या लोकसभेतील त्या व हीना गावित सर्वांत युवा (वय 26) सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या त्या स्नुषा आहेत. सासरी आल्यानंतर सन 2010 मध्ये त्यांनी मुक्ताईनगर (जि.जळगाव) येथील ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून त्या विजयी झाल्या. ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी राजकीय जीवनास सुरवात केली. याच वर्षी त्या मुक्ताईनगरच्या सरपंच झाल्या. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्या झाल्या, शिक्षण समितीचे सभापतिपदही त्यांना मिळाले. शिक्षण समिती सभापती असताना त्यांनी आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटविला होता. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षातर्फे रावेर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली. त्या तब्बल चार लाखापेक्षा अधिक मतांनी विजयी झाल्या. रावेर लोकसभा मतदार संघात त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली आहे. मतदार संघातील दुर्गम भागातील गावांना भेटी देवून त्यांनी तेथील जनतेशी संवाद साधला. तसेच त्या गावांना आवश्‍यक असलेल्या सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांचा मतदार संघात दांडगा संपर्क आहे. 

संबंधित लेख