birthday of rajeev satav | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

आजचा वाढदिवस : ऍड. राजीव सातव, खासदार, हिंगोली, कॉंग्रेस

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

पहिल्याच प्रयत्नात आमदार तर दुसऱ्या प्रयत्नात थेट खासदार...आणि येत्या काळातील कॉंग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार...अशी ओळख ऍड. राजीव सातव यांची निर्माण झाली आहे. कॉंग्रेसच्या नव्या पिढीच्या नेत्यांमधील एक धुरंधर राजकारणी म्हणून राज्यातच नव्हे संपूर्ण देशभरात ते परिचित आहेत. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कोअर टीममधील हुकमी एक्का म्हणूनही त्यांची वेगळी ओळख आहे. त्यांच्या आई माजी मंत्री रजनीताई सातव यांच्याकडून बालवयातच राजकारणाचे बाळकडू त्यांना मिळाले आहे. त्यामुळे तरुणपणीच राजकारणात पदार्पण केलेल्या सातव यांची ओळख आता सर्वदूर झाली आहे. 2002 मध्ये कळमनुरी (जि.

पहिल्याच प्रयत्नात आमदार तर दुसऱ्या प्रयत्नात थेट खासदार...आणि येत्या काळातील कॉंग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार...अशी ओळख ऍड. राजीव सातव यांची निर्माण झाली आहे. कॉंग्रेसच्या नव्या पिढीच्या नेत्यांमधील एक धुरंधर राजकारणी म्हणून राज्यातच नव्हे संपूर्ण देशभरात ते परिचित आहेत. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कोअर टीममधील हुकमी एक्का म्हणूनही त्यांची वेगळी ओळख आहे. त्यांच्या आई माजी मंत्री रजनीताई सातव यांच्याकडून बालवयातच राजकारणाचे बाळकडू त्यांना मिळाले आहे. त्यामुळे तरुणपणीच राजकारणात पदार्पण केलेल्या सातव यांची ओळख आता सर्वदूर झाली आहे. 2002 मध्ये कळमनुरी (जि. हिंगोली) पंचायत समितीच्या मसोड गणाचे ते सदस्य झाले. 2007 मध्ये हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये सदस्य व कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती झाले. 2009 मध्ये कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. याच काळात आधी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व नंतर अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. मोदींच्या लाटेत सुद्धा ऍड. राजीव सातव 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हिंगोली मतदारसंघातून ते लोकसभेत निवडून गेले. संसदेतील त्यांच्या लक्षवेधी व अभ्यासपूर्ण कामगिरीच्या बळावर त्यांना सलग तिसऱ्यांदा संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद असो की गुजरात विधानसभेच्या निवडणुका असो अथवा पंजाब राज्यात कॉंग्रेसचा झेंडा फडकाविणे असो... अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पार पाडल्या आहेत. 

संबंधित लेख