Birthday Pandurang Fundkar BJP Maharashtra | Sarkarnama

आजचा वाढदिवस : पांडुरंग तथा भाऊसाहेब फुंडकर, कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

ता. 21 आॅगस्ट, 1950

पांडुरंग तथा भाऊसाहेब फुंडकर, राज्याचे कृषी मंत्री. भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष. अकोला लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा लोकसभेत पक्षाचे प्रतिनिधीत्व

पांडुरंग तथा भाऊसाहेब पुंडलिक फुंडकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. फुंडकर हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून नवव्या, दहाव्या आणि अकराव्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. पांडुरंग फुंडकर हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्षही होते. सध्या ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात कृषीमंत्री आहेत.

फुंडकर यांच्या राजकीय कारकिर्दीला जनसंघापासून प्रारंभ झाला. आणिबाणीविरोधी आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे त्यामुळे तुरुंगात जावे लागले. पुढे त्यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले. त्यांनी कापसाच्या दरासाठी खामगाव ते आमगाव अशी पदयात्रा काढली होती.
अकोला लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडले गेले. राजीव गांधींच्या हत्येमुळे काँग्रेसची प्रचंड लाट असतानाही पुढील निवडणुकीतही अकोला लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळविला.

यानंतर युती सरकारच्या काळात कापूस पणन महासंघाच्या मुख्य प्रशासकपदी नेमणूक झाली. त्याच काळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते सतत तीन वर्षे कार्यरत होते. त्यांनंतर त्यांची विधान परिषदेवर नियुक्‍ती झाली आणि विरोधी पक्षनेते पद मिळाले. उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार देखील फुंडकर यांना मिळाला आहे.

संबंधित लेख