birthday of nirmala gavit | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

आजचा वाढदिवस : निर्मला गावित, आमदार, कॉंग्रेस (इगतपुरी)

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

धरणांचा तालुका, महाराष्ट्राचे चेरापुंजी मानल्या जाणाऱ्या इगतपुरीच्या त्या आमदार आहेत. धरणांसाठी जमिनी दिलेले शेतकरी, आदिवासींची शेती वर्षानुवर्षे पाण्याच्या प्रतीक्षेत होत्या. शेती कोरडवाहू राहिल्याने परिसराचा विकास खंडित झाला होता. शंभर टक्के अनुदानातील उपसा सिंचन योजना त्यांनी राबविल्या. त्यातून हजारो एकर शेती सिंचनाखाली आल्या. त्यामुळे आदिवासींच्या जीवनात परिवर्तन निर्माण करणाऱ्या आमदार म्हणून त्या परिचित आहेत. 

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व सलग नऊ वेळा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेल्या माणिकराव गावित यांच्या त्या कन्या. त्यांचे पती रमेश गावित पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता आहेत. 1997 मध्ये त्या नाशिक महापालिकेच्या नगरसेविका झाल्या. 2002 मध्ये पुन्हा नगरसेविका बनल्या. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील शेतीला पाणी मिळावे यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या देवमोगरा माता सेवाभावी संस्थेतर्फे त्यांनी आदिवासींसाठी उपसा सिंचन योजना राबविल्या. त्यांचा मोठा जनसंपर्क आणि भरीव कामामुळे कॉंग्रेसने त्यांना 2009 मध्ये विधानसभेची उमेदवारी दिली. 2009 आणि 2014 सलग दोन वेळा त्या आमदार आहेत. मतदारसंघाच्या प्रश्‍नांसाठी सदैव जागरूक असणाऱ्या गावित राज्यात अभ्यासू आमदार म्हणून परिचित आहेत. 

संबंधित लेख