birthday of nimgire | Sarkarnama

आजचा वाढदिवस : चंद्रहास निमगिरे, माजी उपसभापती व महाराष्ट्र केसरी

संपत मोरे
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

जेऊरवाडी करमाळा तालुक्‍यातलं छोटस गावं. या गावातील निमगिरे घराणं कुस्तीप्रेमी. या घरातील मनोहर निमगिरे यांनी कुस्तीत नावलौकिक मिळवला होता. तोच वारसा त्यांचा मुलगा माणिक यांनी पुढं चालवला. त्यानाही घराण्याचे नाव राखले. चांगली कुस्ती मेहनत करून जेऊरवाडीला कीर्ती मिळवून दिली. हाच कुस्तीचा वारसा आपल्या पोराने चालवला पाहिजे म्हणून माणिक निमगिरे यांनी पोराला कळायला लागल्यापासून कुस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली. नंतर त्यांनी हा पोराला रस्तुम ए हिंद हरिशचंद्र बिराजदार मामा यांच्याकडे गोकुळ वस्ताद तालमीत कुस्तीचे धडे गिरवायला पाठवले. मामांसारख्या रत्नपारखीने या हिऱ्याला पैलू पाडले.

जेऊरवाडी करमाळा तालुक्‍यातलं छोटस गावं. या गावातील निमगिरे घराणं कुस्तीप्रेमी. या घरातील मनोहर निमगिरे यांनी कुस्तीत नावलौकिक मिळवला होता. तोच वारसा त्यांचा मुलगा माणिक यांनी पुढं चालवला. त्यानाही घराण्याचे नाव राखले. चांगली कुस्ती मेहनत करून जेऊरवाडीला कीर्ती मिळवून दिली. हाच कुस्तीचा वारसा आपल्या पोराने चालवला पाहिजे म्हणून माणिक निमगिरे यांनी पोराला कळायला लागल्यापासून कुस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली. नंतर त्यांनी हा पोराला रस्तुम ए हिंद हरिशचंद्र बिराजदार मामा यांच्याकडे गोकुळ वस्ताद तालमीत कुस्तीचे धडे गिरवायला पाठवले. मामांसारख्या रत्नपारखीने या हिऱ्याला पैलू पाडले. मामांचे मार्गदर्शन आणि स्वतःचे परिश्रमाच्या बळावर चंद्रहास तीन वेळा महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत गेले, पहिल्या दोन वर्षात यश मिळाले नाही पण 2004 मध्ये जेऊरवाडी सारख्या छोट्या गावच्या पोरानं महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली. घराण्याचा कुस्तीचा वारसा राखत वडिलांचं स्वप्न साकार केलं. महाराष्ट्र केसरी झाल्यावर दोन वर्षांनी ते गावी आले, लोकांच्या प्रेमाखातर पंचायत समितीची निवडणूक लढवली. करमाळा तालुक्‍याचे उपसभापती झाले. महाराष्ट्र केसरीचा असा राजकरणाकडे प्रवेश झाला आणि कुस्तीच्या आखाड्यातला पैलवान पंचायत समितीचे उपसभापती होऊन लोकांचे प्रश्न सोडवू लागले. उपसभापतीचा कार्यकाल संपल्यावर ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणून ते काम करू लागले. सध्या ते आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. राजकारणात गेलेले निमगिरे कुस्तीला मात्र विसरलेले नाहीत. त्यानी त्यांच्या गावात 'शिवशंभू'कुस्ती संकुल उभे केले आहे. त्यांचे गुरु आणि रस्तुम ए हिंद हरीशचंद्र बिराजदार मामा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ते पैलवान घडवण्याचे काम करत आहेत. दिवसभर तालुक्‍याच्या राजकारणात दिसणारा हा बजरंगबलीचा भक्त भल्या पहाटे कोठे असतो तर कुस्ती संकुलातील पोरांच्या सोबत. त्याना कुस्तीचे धडे देत असतो. त्यांना घडवत असतो. राजकारण आणि कुस्ती दोन्हीकडे लक्ष देत त्याचा समन्वय साधणारा हा आगळावेगळा माणूस आहे. 

संबंधित लेख