birthday of nana patole ex mp | Sarkarnama

आजचा वाढदिवस : नाना पटोले, माजी खासदार

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 5 जून 2018

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर दोनवेळा सत्तेची पदे सोडणारा नेता म्हणून नाना पटोले विदर्भात परिचित झाले आहेत. भंडारा जिल्ह्यातील सुकळी या खेड्यातून राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या नाना पटोले यांनी राज्याच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 1990 मध्ये भंडारा जिल्हा परिषदेत ते कॉंग्रेसचे सदस्य म्हणून निवडून आले. लोकांचे प्रश्‍न घेऊन लढणाऱ्या नाना पटोले यांनी लवकरच मतदारसंघात आपल्या कामाने छाप पाडली. 1999 मध्ये ते साकोली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून ते शेतकऱ्यांचे प्रश्‍न ते मांडत होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर दोनवेळा सत्तेची पदे सोडणारा नेता म्हणून नाना पटोले विदर्भात परिचित झाले आहेत. भंडारा जिल्ह्यातील सुकळी या खेड्यातून राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या नाना पटोले यांनी राज्याच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 1990 मध्ये भंडारा जिल्हा परिषदेत ते कॉंग्रेसचे सदस्य म्हणून निवडून आले. लोकांचे प्रश्‍न घेऊन लढणाऱ्या नाना पटोले यांनी लवकरच मतदारसंघात आपल्या कामाने छाप पाडली. 1999 मध्ये ते साकोली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून ते शेतकऱ्यांचे प्रश्‍न ते मांडत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर राज्य सरकार योग्य निर्णय घेत नसल्याचा आरोप करून नाना पटोले यांनी 2008 मध्ये आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून 2009 मध्ये लोकसभेची निवडणूक लढविली. यात पराभूत झाल्यानंतर 2014 मध्ये भाजपकडून ते लोकसभेची निवडणूक जिंकले. पुन्हा शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली व खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला पुन्हा निवडून आणण्यात पटोले यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. 

संबंधित लेख