आजचा वाढदिवस : महेश लांडगे, आमदार, भोसरी. (अपक्ष, सहयोगी सदस्य भाजप)

आजचा वाढदिवस : महेश लांडगे, आमदार, भोसरी. (अपक्ष, सहयोगी सदस्य भाजप)

महेश लांडगे हे पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे आमदार आहेत. पैलवान असलेले हे तरुण आमदार 2014 ला अपक्ष म्हणून निवडून आले. नंतर ते भाजपचे सहयोगी सदस्य झाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच भाजप गेल्यावर्षी सत्तेत आली. त्यात लांडगे यांचा मोठा सहभाग आहे. तरुण कार्यकर्त्यांचे मोठे नेटवर्क त्यांच्याकडे आहे. पदवीधर असलेल्या या आमदारांचे आवडते विषय वाचन, व्यायाम, क्रीडा, संगीत आणि चित्रपट हे आहेत, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि दिवंगत माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम हे आदर्श आहेत. कुस्ती आणि कबड्डीत त्यांनी शालेय स्तरापासून नेतृत्व केलेले आहे. वडिलांप्रमाणे कुस्तीतच त्यांना करिअर करायचे होते. मात्र, सामाजिक कामाच्या आवडीतून त्यांचा राजकीय क्षेत्रात प्रवेश झाला. "एनएसयूआय'चे शहराध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. 2004 ला ते राष्ट्रवादीचे नगरसेवक झाले. नंतर त्यांनी नगरसेवकपदाची हॅटट्रिक केली. नगरसेवक असतानाच 2014 ला ते आमदार झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ते सिनेट सदस्य, राज्य कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष, तर राज्य बॉडीबिल्डींग असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. नागरिकांच्या समस्यांच्या निवारणासाठी त्यांनी परिवर्तन हेल्पलाइन सुरू केली आहे. मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्यांनी " भोसरी व्हीजन 2020' हा उपक्रम सुरू केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्‍वासू समर्थक असल्याने राज्य मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूरचे भाजपचे उमेदवार म्हणूनही त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com