आजचा वाढदिवस : लक्ष्मण जगताप - आमदार - चिंचवड.

आजचा वाढदिवस : लक्ष्मण जगताप - आमदार - चिंचवड.

लक्ष्मण जगताप हे भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष असून चिंचवडचे आमदार आहेत. ते भाऊ म्हणून ओळखले जातात. 33 वर्षे ते राजकारणात असून यापूर्वी दोनदा विधानपरिषदेचे सदस्य होते. वीस वर्षे पिंपरी महापालिकेत नगरसेवक होते. महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपद त्यांनी भूषविलेले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत ते चिंचवडमधून आमदार म्हणून निवडून आले. 2017 ला पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच भाजप सत्तेत येण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कार्यकर्त्यांचे मोठे जाळे त्यांच्याकडे आहे. राज्यातील दुष्काळ परिस्थितीमुळे ते यावेळी आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत. तसेच यानिमित्त फ्लेक्‍स लावू नयेत, असे त्यांनी पाठीराख्यांना सांगितले आहे. त्यातून वाचलेला पैसा ते दुष्काळ निधी म्हणून देणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com