आजचा वाढदिवस - एच. डी. देवेगौडा - माजी पंतप्रधान.

आजचा वाढदिवस - एच. डी. देवेगौडा - माजी पंतप्रधान.

देवेगौडा यांचा जन्म 18 मे 1933 रोजी म्हैसूर येथे झाला. त्यांचे वडील शेतकरी होते. कर्नाटकातील हसन मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करत आहेत. जनता दल (सेक्‍युलर) पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. 1962 साली, देवेगौडा स्वतंत्र उमेदवार म्हणून कर्नाटक विधानसभेवर निवडून गेले. नंतर 1962 पासून 1989 पर्यंत सलग सहा वेळा विधानसभेत ते निवडून आले. कॉंग्रेसच्या विभाजनात त्यांनी कॉंग्रेस (ओ) मध्ये प्रवेश केला आणि मार्च 1972 पासून मार्च 1976 पर्यंत पुन्हा विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला. त्यांनी 1983 पासून 1988 पर्यंत रामकृष्ण हेगडे यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकमधील जनता पार्टी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले. 1994 ते 1996 या काळात कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री पदावर होते. 1996 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पीव्ही नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्ष निर्णायक ठरला परंतु इतर पक्षांनी सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा जिंकल्या नाहीत. त्यावेळेस संयुक्त आघाडी स्थापन होऊन केंद्रात कॉंग्रेसच्या पाठिंब्याने ते भारताचे 11 वे पंतप्रधान झाले. 1 जून 1996 ते 11 एप्रिल 1997 पर्यंत ते पंतप्रधानपदावर होते. संयुक्त आघाडीच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष होते. 2004 च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत जनता दल (सेक्‍युलर) यांनी 58 जागा जिंकल्या. भाजपबरोबरच्या सहभागातून त्यांनी कर्नाटकमध्ये पर्यायी सरकार स्थापन केले. त्यांचे पुत्र एचडी कुमारस्वामी यांनी भाजप-जेडी (एस) आघाडी सरकारचे नेतृत्व केले. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 38 जागा मिळाल्या आहेत. कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर त्यांचा मुलगा एच. डी. कुमारस्वामी यांची कर्नाटक राज्याच्या प्रमुखपदासाठी या आघाडीच्या वतीने निवड करण्यात आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com