birthday of datta meghe | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

आजचा वाढदिवस : माजी खासदार दत्ता मेघे

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात खंबीरपणे पाय रोवणारे दत्ता मेघे यांचे विदर्भातील राजकारणात एक वेगळे स्थान आहे. वर्धा जिल्ह्यात जन्मलेले दत्ता मेघे शिक्षणासाठी नागपुरात आले व नागपूरच त्यांचे कार्यक्षेत्र झाले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेंद्र तिडके यांचे शिष्य राहिलेले दत्ता मेघे यांनी राज्याच्या कारणात शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले. 1978 मध्ये पुलोदच्या सरकारमध्ये विदर्भातून दत्ता मेघे मंत्री होते. तेव्हापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात खंबीरपणे पाय रोवणारे दत्ता मेघे यांचे विदर्भातील राजकारणात एक वेगळे स्थान आहे. वर्धा जिल्ह्यात जन्मलेले दत्ता मेघे शिक्षणासाठी नागपुरात आले व नागपूरच त्यांचे कार्यक्षेत्र झाले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेंद्र तिडके यांचे शिष्य राहिलेले दत्ता मेघे यांनी राज्याच्या कारणात शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले. 1978 मध्ये पुलोदच्या सरकारमध्ये विदर्भातून दत्ता मेघे मंत्री होते. तेव्हापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. अनेक वर्ष मंत्री, विरोधी पक्षनेता अशी पदे भूषवित 1991 मध्ये त्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून विजय संपादन केला. यानंतर रामटेक (1996) व वर्धा (1998) या मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले. विदर्भातील तीन मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणारे ते विदर्भातील एकमेव नेते आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर मात्र त्यांनी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. वर्धा येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून त्यांनी विदर्भात अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या आहेत. 

 

संबंधित लेख