birthday of chandrakant khaire | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

आजचा वाढदिवस : चंद्रकांत खैरे, खासदार , शिवसेना औरंगाबाद लोकसभा)

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 1 जानेवारी 2019

औरंगाबाद येथील डेक्कन प्लोअर मिलमध्ये ते सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. 1984-85 मध्ये ते शिवसेना या पक्षाशी जोडले गेले. मराठवाड्यात स्थापन झालेल्या पहिल्या शिवसेना शाखेचे ते प्रमुख देखील होते. कालांतराने शिवसेना औरंगाबाद आणि मराठवाड्यात वाढीला लागली आणि 1988 मध्ये औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत खैरे यांनी गुलमंडी वॉर्डातून आपल्या कारकिर्दीतील पहिली निवडणूक लढवली. नगरसेवक झाल्यानंतर 88-90 दरम्यान ते महापालिकेत विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर चंद्रकांत खैरे 90 आणि 95 मध्ये सलग दोनदा विधानसभेवर निवडून गेले.

औरंगाबाद येथील डेक्कन प्लोअर मिलमध्ये ते सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. 1984-85 मध्ये ते शिवसेना या पक्षाशी जोडले गेले. मराठवाड्यात स्थापन झालेल्या पहिल्या शिवसेना शाखेचे ते प्रमुख देखील होते. कालांतराने शिवसेना औरंगाबाद आणि मराठवाड्यात वाढीला लागली आणि 1988 मध्ये औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत खैरे यांनी गुलमंडी वॉर्डातून आपल्या कारकिर्दीतील पहिली निवडणूक लढवली. नगरसेवक झाल्यानंतर 88-90 दरम्यान ते महापालिकेत विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर चंद्रकांत खैरे 90 आणि 95 मध्ये सलग दोनदा विधानसभेवर निवडून गेले. युती सरकारच्या काळात त्यांनी गृहनिर्माण, परिवहन, वन आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम पाहिले. औरंगाबादच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे होती. 1999 मध्ये खैरे यांना शिवसेनेकडून औरंगाबाद लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासून सलग चार वेळा चंद्रकांत खैरे या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. लोकसभेतील गटनेते, शिवसेनेचे उपनेते म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर पक्षनेतृत्वाने नुकतीच त्यांची शिवसेनानेतेपदी नियुक्ती केली. याशिवाय केंद्र सरकारच्या विविध समित्यांवर त्यांची अध्यक्ष तसेच सदस्य म्हणूनही नेमणूक करण्यात आलेली आहे. 

संबंधित लेख