birthday of arjun khotkar | Sarkarnama

आजचा वाढदिवस : अर्जुन खोतकर, जालना- शिवसेना, राज्यमंत्री वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन व दुग्धविकास

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 1 जानेवारी 2019

शेतकरी कुटुंबात जन्मलेले खोतकर पुढे शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले. जालना कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांचे राजकारण सुरू असताना पक्षाने त्यांना विधानसभेवर संधी दिली. 90, 95 आणि 2004, 2014 चार वेळा जालना विधानसभेचे त्यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे. 95-99 युती सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर 2014 मध्येदेखील त्यांना शिवसेनेकडून राज्यमंत्री पद बहाल करण्यात आले. खोतकर यांच्याकडे सध्या वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याचा राज्यमंत्रीपदाचा कार्यभार आहे.

शेतकरी कुटुंबात जन्मलेले खोतकर पुढे शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले. जालना कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांचे राजकारण सुरू असताना पक्षाने त्यांना विधानसभेवर संधी दिली. 90, 95 आणि 2004, 2014 चार वेळा जालना विधानसभेचे त्यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे. 95-99 युती सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर 2014 मध्येदेखील त्यांना शिवसेनेकडून राज्यमंत्री पद बहाल करण्यात आले. खोतकर यांच्याकडे सध्या वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याचा राज्यमंत्रीपदाचा कार्यभार आहे. अंदाज पत्रिका समितीचे सदस्य असलेल्या अर्जुन खोतकर यांच्याकडे 2017 मध्ये नांदेड तर सध्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

संबंधित लेख