Birthday : Anil Deshmukh | Sarkarnama

आजचा वाढदिवस : अनिल देशमुख 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 मे 2017

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांचे राजकारण जिल्हा परिषदेपासून सुरू झाले...

अनिल देशमुख

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांचे राजकारण जिल्हा परिषदेपासून सुरू झाले. 1992 च्या नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर ते लगेच नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. 1995 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काटोल मतदारसंघातून कॉंग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढविली व यशस्वी झाले. युती सरकारमध्ये ते राज्यमंत्री झाले. 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. युती सरकारनंतर आघाडी सरकारमध्येही ते मंत्री झाले. सतत 15 वर्षे ते राज्य मंत्रिमंडळात कायम होते. 2014 मध्ये ते काटोल मतदारसंघातून भाजपचे आशीष देशमुख यांच्याकडून पराभूत झाले.  
 

संबंधित लेख