आजचा वाढदिवस : आदित्य ठाकरे , युवासेना प्रमुख शिवसेना

 आजचा वाढदिवस : आदित्य ठाकरे , युवासेना प्रमुख शिवसेना

आदित्य ठाकरे म्हणजे शिवसेनेच्या पुढच्या नेतृत्वासाठीचे प्रमुख नाव. प्रबोधनकार ठाकरे घराण्यातील हा युवा नेता 2010 पासून राजकारणात खऱ्या अर्थाने सक्रीय झाला. 2007 मध्ये त्यांच्या कवितांच्या पुस्तकाचे प्रकाशन मोठ्या समारंभपूर्वक करण्यात आले होते. विधानसभेच्या मागील निवडणुकीत म्हणजे 2014 च्या निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबरोबर शिवसेनेच्यावतीने वाटाघाटी करण्यात आदित्य ठाकरे आघाडीवर होते. शिवसेनेच्या युवा सेना या तरुणांच्या विभागाचे ते अध्यक्ष आहेत. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी प्रतिनिधींच्या निवडणुकीत त्यांनी आवर्जून लक्ष घालून यश मिळवले होते. सध्या शिवसेनेचे नेते म्हणून पक्षाचे धोरण ठरवण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग असतो. ठाकरे घराण्यातील कुणाही व्यक्तीने आजपर्यत निवडणूक लढवलेली नाही. मात्र आदित्य ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरतील अशी चिन्हे आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com