bipin ravat | Sarkarnama

पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज - जनरल बिपिन रावत

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली : जम्मू काश्‍मीरमधील सध्याची स्थिती लक्षात घेता व सीमेपलिकडून अतिरेक्‍यांना होणारी मदत विचारात घेतल्यास पाकिस्तानविरुद्ध आणखी एका सर्जिकल स्ट्राईकची गरज असल्याचे मत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी व्यक्त केले आहे. मात्र हा स्ट्राईक केव्हा आणि त्याचे स्वरुप कसे असेल याबाबत आम्ही ठरवू असेही त्यांनी यावेळी सांगितले. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी हे मत व्यक्त केले. 

पाकिस्तानबरोबरच्या तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर रावत यांच्या या वक्तव्याला महत्त्व आहे. पाकिस्तानी लष्कराकडून जम्मू काश्‍मीरमधील तीन पोलिसांची हत्या करून त्यांच्या मृतदेहांची विटंबना केल्यानंतर केंद्रसरकारने पाकिस्तानबरोबरची चर्चा रद्द केली होती. सरकारच्या या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले होते. 2016 मध्ये पाकिस्तानने उरी येथे भारतीय लष्करावर हल्ला केल्यानतंर भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. 

संबंधित लेख