बायोगॅसवर चालतो वीज पंप, आणि बरेच काही..

कोल्हापूर जिल्ह्यातील जांभळी (ता. शिरोळ) येथील अभय व आकाश पाटील- मोटके या बंधूच्या घरी कडबा कुट्टी मशीन आणि शेतातील पाणी उपसा पंपही बायोगॅसवर चालविले जाते.
कोल्हापूर जिल्ह्यातील जांभळी (ता. शिरोळ) येथील अभय व आकाश पाटील- मोटके या बंधूच्या घरी कडबा कुट्टी मशीन आणि शेतातील पाणी उपसा पंपही बायोगॅसवर चालविले जाते.

कोल्हापूर : जिल्ह्यातील जांभळी (ता.शिरोळ) येथील अभय व आकाश पाटील- मोटके या बंधूनी गायींच्या शेणावर आधारित बायोगॅसचा यशस्वी प्रयोग केला आहे. गेल्या पाच वर्षापासून बायोगॅसच्या माध्यमातून गोठ्यासाठी लागणारी विविध उपकरणे चालवून वीज टंचाईवर मात केली आहे. विशेष म्हणजे ही उपकरणे त्यांनी चालविलीच पण शेताला पाणी पुरवठा करणारा पंपही अव्याहतपणे याच उर्जेवर सुरु असतो. केवळ गोठा न करता त्याचे व्यावसाय मुल्य वाढविणारे हे प्रयोग शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिशादर्शक आहेत. 
दररोज दोन टन शेणाची निर्मिती 
सुमारे दोनशेहून अधिक गाईंचा समावेश श्री पाटील - मोटके बंधूच्या गोठ्यात आहे. यातून दररोज दोन टन शेणाची निर्मिती होते. या शेणापासून वीज निर्मिती करुन त्याचा उपयोग शेतीपूरक उपकरणे चालविण्यासाठी करता येइल का हा विचार आला. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरु केले. भारनियमनाला पर्याय म्हणून त्यांच्याकडे जनरेटर आहे. पण वीज गेल्यानंतर अनेक तास ती जात असल्यने इंधनाचा खर्च अधिक होत होता. यावर त्यांना पर्याय शोधायचा होता. पुण्याच्या एका संस्थेचा पत्ता मिळाला. तेथे जाऊन त्यांनी प्रात्यक्षिक प्रकल्प पाहिला. तो पसंत पडल्यानंतर आपल्या भागात त्याच्या उभारणीचे काम सुरू केले. 
उपकरणे कार्यान्वीत 
गोठ्यातून दररोज सुमारे दोन टन शेणखत तयार होते. मजुरांमार्फत छोट्या हातगाडीमार्फत हे शेणखत गोळा केले जाते. ते प्रथम चौकोनी आकाराच्या शेणकुंडीत टाकले जाते. ही शेणकुंडी आठ बाय आठ फूट क्षेत्रफळ असलेली आहे. या शेणकुंडीत गोठा धुतलेले पाणी सोडले जाते. शेणकुंडीत पंपाच्या साहाय्याने पाणी व शेणाचे मिश्रण केले जाते. पन्नास टक्के शेण व तितकेच पाणी असे मिश्रण तयार होते. तयार झालेले मिश्रण बारा इंच पाइपमधून जवळच असलेल्या बायोगॅस डायजेस्टरमध्ये सोडले जाते. एकतीस फूट व्यास व पंचवीस फूट खोली असे सिमेंटचे बांधकाम असलेले हे डायजेस्टर आहे. या डायजेस्टरमध्ये गॅस तयार होतो. हा गॅस दीड इंची पीव्हीसी पाइपमधून रबरीबलूनमध्ये जातो. सुमारे पंचावन्न घनमीटर आकाराचा हा बलून आहे. या बलूनमधूनहा गॅस पाणी असलेल्या दोन लोखंडी टाक्‍यांत (स्क्रबर) जातो. तेथे हायड्रोजन सल्फाईड पाण्यात विरघळतो म्हणजे वेगळा होतो. त्यानंतर तयार शुध्द मिथेन बलूनमध्ये पाठवला जातो. त्यानंतर शुध्द स्वरूपातील हा मिथेन बायोगॅस जनरेटरला पाठवण्यात येऊन त्याआधारे उपकरणे चालतात. व्हॉल्व्हच्या साहाय्याने हा जनरेटर चालू - बंद करता येतो. या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेला जनरेटर हा पंधरा केव्ही क्षमतेचा आहे. बायोगॅस तयार झाल्यानंतर तयार झालेली स्लरी शेजारील खड्ड्यात जाते. काही काळ वाळविल्यानंतर त्याचा शेतीसाठी वापर करता येतो. 
उत्साहवर्धक अनुभव - मोटके 
या सगळ्यासाठी पंचवीस लाख रुपयांचा खर्च आला आहे. केंद्र सरकारचे चार लाख ऐंशी हजार रुपयांचे अनुदान यासाठी मिळाले आहे. या प्रकल्पात दररोज दोन टन शेणखतापासून सुमारे दीडशे युनिट विजेची निर्मिती होते. पाणी खेचण्यासाठीची दहा अश्‍वशक्तीची विद्युत मोटर सुमारे पंधरा तास अखंडपणे चालू राहते. तयार झालेल्या ऊर्जेच्या माध्यमातून चार अश्‍वशक्तीचे दूध काढण्याचे यंत्र, साडेसात अश्‍वशक्तीचे कडबा कुट्टी यंत्र, दहा अश्‍वशक्तीचा विद्युत पाणी उपसा पंप चालविला आहे. गेल्या पाच वर्षाहून अधिक ही कामे बायोगॅसवर सातत्याने सुरु आहेत. राज्यभरातील तज्ज्ञांनी, शेतकऱ्यांनी आमच्या या प्रकल्पाला भेट देवून समाधान व्यक्त केल्याचे मोटके यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com