bihar politics top leaders meet lalu prasad yadav in hospital | Sarkarnama

आगामी लोकसभा निवडणुकीत "एनडीए' बिहारमध्ये खातेही उघडणार नाही 

उज्ज्वलकुमार 
शनिवार, 29 डिसेंबर 2018

पाटणा ः वाढत्या थंडीतही बिहार-झारखंडातील राजकारण तापू लागले आहे. आता निमित्त आहे, ते महागटबंधनातील तीन नेत्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या घेतलेल्या भेटीचे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) या दोन राज्यांत खातेही उघडू शकणार नाही, असा या तिघांचा दावा आहे. 

विधानसभेतील विरोधी नेते तेजस्वी यादव, राष्ट्रीय लोक समता पक्षाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह आणि नव्यानेच स्थापन झालेल्या इन्सान पक्षाचे प्रमुख मुकेश सहनी यांनी लालूप्रसाद यांची भेट घेतल्यामुळे राजकीय तर्क सुरू झाले आहेत.

पशुखाद्य गैरव्यवहारात सध्या कारागृहात असलेल्या लालूंवर रांचीच्या "रिम्स' रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तिघांनी तेथेच त्यांची भेट घऊन चर्चा केली. भाजपमध्ये असलेले; पण जाहीर नाराजी व्यक्त करणारे शत्रुघ्न सिन्हा तसेच कॉंग्रेसचे नेते सुबोधकांत सहाय यांनी नुकतीच लालूंची भेट घेतली होती. 

आगामी निवडणुकीत महागटबंधनातील जागावाटप नंतर जाहीर केले जाईल; पण या संदर्भात समझोता झाला असल्याचे कुशवाह यांनी सांगितले. एनडीएपेक्षा आमची स्थिती चांगली असून, समाजाच्या विविध स्तरांत पाठिंबा असलेले पक्ष महागटबंधनात सहभागी होत असल्यामुळे एनडीला मते मिळतील कोठून, असा प्रश्‍न त्यांनी केला. 

"सन ऑफ मल्लाह' किंवा इन्सान पक्षाचे सहनी यांच्या मते, बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार, उप मुख्यमंत्री सुशील मोदी आणि लोक जनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान हेच एनडीएचे चेहरे आहेत. मात्र, या तिघांना दहा जागाही मिळणार नाहीत, असा दावा सहनी यांनी केला. आमचे जागावाटप सुरळीत होईल, त्यात काही अडचणी येणार नाहीत, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले. 

संबंधित लेख