Bhushan Gagrai will have CMO's charge | Sarkarnama

भूषण गगराणी यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालयाची जबाबदारी 

सरकारनामा
शुक्रवार, 10 मे 2019

भूषण गगराणी मूळचे कोल्हापूरचे आहेत. त्यांनी मराठी भाषेची आय.ए.एस.परीक्षेसाठी निवड केली होती. त्यात त्यांना मिळालेले गुण आजही रेकॉर्ड आहेत. 

मुंबई: अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नेमणूक होणार असल्याने  आता  मुख्यमंत्री कार्यालयाची (सीएमओ ) जबाबदारी  भूषण गगराणी यांच्याकडे येणार आहे . 

गेल्यावर्षी मे महिन्यातच भूषण गगराणी यांची सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावरून  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली  होती .  अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी  तेंव्हा  मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रमुख होते . आता त्याची बदली होत असल्याने   मुख्यमंत्री कार्यालयाची  संपूर्ण जबादारी  भूषण गगराणी यांच्याकडे येणार आहे .

भूषण गगराणी हे १९९० च्या बॅचचे आय.ए.एस. अधिकारी आहेत . त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ , महाराष्ट्र पर्यटन महामंडळ , महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ अशा विविध महामंडळाचे काम पाहिलेले आहे . वैद्यकीय शिक्षण तसेच सार्वजनिक आरोग्य खात्याचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे . भूषण गगराणी १९९९ ते २००३ याकाळातही मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत होते . 

औरंगाबाद ज़िल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी  म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे . भूषण गगराणी मूळचे कोल्हापूरचे आहेत. त्यांनी मराठी भाषेची आय.ए.एस.परीक्षेसाठी निवड केली होती. त्यात त्यांना मिळालेले गुण आजही रेकॉर्ड आहेत.

संबंधित लेख