Bhujbal To Visit Nashik Tomorrow | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

छगन भुजबळांच्या आगमनाने कार्यकर्ते उत्साहात : जिल्हाधिकारी मात्र चिंतेत? 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 जून 2018

न्यायालयाने परवानगी दिल्याने भुजबळ उद्या (ता.14) नाशिकला येत आहेत. त्यांचे शहराच्या पाथर्डी फाटा येथे मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्याची तयारी आहे. येथे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन करतील. त्यानंतर बाईक रॅलीसमवेत गणेशवाडी येथे महात्मा फुले आणि शिवाजी रोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे पुजन करतील. त्यानंतर ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जातील.

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री अडीच वर्षांनी नाशिकला येत आहेत. मात्र यावेळी ते या सबंध कालावधीतील विकासाचा 'बॅकलॉग' भरुन काढण्याच्या इराद्यानेच शहरात पाय ठेवणार आहेत. यावेळी त्यांचे भव्य स्वागत होईल. मात्र, हे स्वागत स्विकारल्यावर ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अडीच वर्षातील समस्या व रेंगाळलेल्या कामांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना देतील. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत उत्साह तर जिल्हाधिकारी काहीसे काळजीत असल्याचे चित्र होते. 

न्यायालयाने परवानगी दिल्याने भुजबळ उद्या (ता.14) नाशिकला येत आहेत. त्यांचे शहराच्या पाथर्डी फाटा येथे मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्याची तयारी आहे. येथे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन करतील. त्यानंतर बाईक रॅलीसमवेत गणेशवाडी येथे महात्मा फुले आणि शिवाजी रोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे पुजन करतील. त्यानंतर ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जातील. यावेळी गेल्या अडीच वर्षातील रेंगाळलेली कामे, प्रलंबीत प्रश्‍न आणि रखडलेल्या विकासकामांचा आढावा घेतील. त्यासाठी त्यांनी एक यादीच तयार केली आहे. ही यादी ते जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहेत. त्याची पुर्वसूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. 

भुजबळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यावर मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवन मध्ये जाऊन पक्षाचे कार्यकर्ते व आपल्या समर्थकांशी हितगुज करतील. अडीच वर्षांनतर ते शहरात तसेच पक्षाच्या कार्यालयात येणार असल्याने कार्यकर्त्यांत उत्साह आहे. आज सकाळी त्याच्या तयारीसाठी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. भुजबळ फार्म येथे भुजबळ समर्थकांची स्वतंत्र बैठक झाली. 

छगन भुजबळ

संबंधित लेख