मोदींच्या सर्व योजना फेल, भुजबळांचा हल्लाबोल

मोदींच्या सर्व योजना फेल, भुजबळांचा हल्लाबोल

पिंपरी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्व योजना फेल गेल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शनिवारी पिंपरी चिंचवडमध्ये केला.योगी मोदी का एकही नारा,न घर बसा तेरा, न बसने देगा हमारा असे शरसंधानही त्यांनी यावेळी केले.

मोदींचा चहा फेल, मेक इन इंडिया फेल, जीएसटी फेल, नोटबंदी फेल,आता राफेलही फेल,असे भुजबळ म्हणाले.  राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेच्या पिंपरी चिंचवडमधील सभेत ते बोलत होते. यावेळी अजित पवार, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह शहरातील आमदार, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

‘आम आदमी के साथ मन की बात, अदानी के साथ धन की बात’. ‘वारे शासन तेरा खेल, मांगा न्याय, हो गई जेल’. असे सांगत भुजबळ म्हणाले,"अडीच वर्ष मला जेलमध्ये का ठेवलं ते मलाही कळलं नाही, का पकडलं ते ज्यांनी पकडलं त्यांनाही कळलं नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्र सदन बांधले.अमित शहा आजही त्या ठिकाणीच पक्षाच्या बैठका घेतात.

मोदींनी एक तास महाराष्ट्र सदन फिरून बघितलं आहे. 100 कोटीचं हे काम आहे.त्यात साडेआठशे कोटी कसे खाणार. माझ्यावर आरोप करून पुन्हा तोंड बंद करण्याची धमकी दिली.पण, माझं तोंड बंद कदापी होणार नाही. ‘उडने दो मिट्टी को हमपर, हवा ने साथ छोड दिया, तो मिठ्ठी जमिन पर आयेगी’.

हिंदू-मुसलमान मारामारी लावायची, हाच एक कलमी कार्यक्रम भाजपने सुरू केला आहे. चार वर्षात राममंदीरचा विषय आला नाही. निवडणुका आल्यामुळे आता राम मंदिराचा टाहो फोडला जात आहे. यांना राम मंदिर बनवायचं नाही. यांना सरकार बनवायचं आहे. हनुमानाची जात काढली. जैसा रहमान, सुलेमान, सलमान तैसा हनुमान, असे म्हणत हे भाजप सरकार लोकांना दारिद्र्यात बुडविण्याचं काम करत आहे, असे भुजबळ म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com