bhujbal and shivsena alliance | Sarkarnama

शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ..., उध्दव ठाकरे - छगन भुजबळांची मांडीला मांडी

संजय मिस्किन
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मुंबई : राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो. पण बलाढ्य शक्तीचा विरोधक असेल तर मग मात्र या संघर्षात "शत्रू चा शत्रू तो आपला मित्र असतो ' या चाणाक्‍य नितीची प्रचिती राज्याच्या राजकारणात येत असल्याची चर्चा रंगली आहे. त्याचं कारण आहे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मांडीला मांडी लावून केलेल्या" कानगोष्टी'. होय भुजबळ व ठाकरे या दोघांची एका कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट झाली. दोघंही एकाच सोफ्यावर शेजारी शेजारी बसले. दोघांमधे उत्तम व खुल्या मनानं संवाद सुरू होता.

मुंबई : राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो. पण बलाढ्य शक्तीचा विरोधक असेल तर मग मात्र या संघर्षात "शत्रू चा शत्रू तो आपला मित्र असतो ' या चाणाक्‍य नितीची प्रचिती राज्याच्या राजकारणात येत असल्याची चर्चा रंगली आहे. त्याचं कारण आहे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मांडीला मांडी लावून केलेल्या" कानगोष्टी'. होय भुजबळ व ठाकरे या दोघांची एका कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट झाली. दोघंही एकाच सोफ्यावर शेजारी शेजारी बसले. दोघांमधे उत्तम व खुल्या मनानं संवाद सुरू होता. त्यांच्या देहबोलीतून परस्परांबद्दलचा आदर दिसत तर होताच पण चेहऱ्यावरचे भाव काहीतरी गंभीर चर्चा सुरू असल्याचेच होते. 

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांच्या चिरंजीवांच्या लग्नसोहळ्याच्या स्वागत समारंभ नुकताच मुंबईत वरळी मेफेअर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ठाकरे-भुजबळ यांच्या भेटीचा योग जुळला होता. भुजबळ यांच्याबद्दल शिवसेना व शिवसैनिकांच्या मनात सध्या कोणत्याही प्रकारचा राग उरलेला नाही. भुजबळ यांनीही मातोश्री सोबत झालं गेलं विसरून बाळासाहेब असतानाच पुन्हा जिव्हाळ्याचे संबध जोडलेले आहेतच. पण, सध्या भारतीय जनता पक्षाच्या लाटेत शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यात भाजप विरोधात सर्व विरोधी पक्षाची ताकद एकवटत असताना उध्दव ठाकरे व भुजबळ यांच्यातील मांडीला मांडी लावून झालेला संवाद मात्र राजकीय आखाड्यातील चर्चेचा विषय ठरला आहे. 

संबंधित लेख