bhujabal attack bjp | Sarkarnama

बाळासाहेब असते तर कधीच कमळाबाईशी फारकत घेतली असती ? छगन भुजबळांना विश्वास

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

पुणे : "" शिवसेना आणखी किती दिवस तळ्यामळ्यात करणार आहे ? असा सवाल करतानाच जर बाळासाहेब असते तर त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडत कधीच कमळाबाईची फारकत घेतली असती,'' असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. 

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर भुजबळ पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की मी कदापी लोकसभा निवडणूक लढविणार नाही म्हणजे नाही. राज्यात लोकसभेसाठी कोण उमेदवार असतील. कोणाला कोठे उभे करायचे याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष म्हणून शरद पवार घेतील. निवडणुकीपूर्वी काही सर्वे येतात त्या सर्वेनंतर उमेदवारी दिली जाते. 

भाजप सरकारवर शिवसेनेतर्फे दररोज टीका केली जाते. प्रसंगी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेही सरकारवर कठोर शब्दात समाचार घेतात. त्यांचे मुखपत्र तर टीका करण्याची संधी सोडत नाही. पण, सरकारचा पाठिंबा शिवसेना काढत नाही. आणखी किती दिवस तळ्यातमळ्यात करणार ? असा सवाल करून भुजबळ म्हणाले, "" शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी भाजपला सळो की पळो करून सोडले असते आणि नको कमळाबाईची साथ म्हणत फारकत घेतली असती.'' 

संबंधित लेख