Bhivandi Suresh Mhatre Rebellion in Shivsena | Sarkarnama

भिवंडी लोकसभेत शिवसेनेचे सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांच्या उमेदवारीने युतीमध्ये बंडाळी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 एप्रिल 2019

भिवंडी लोकसभेत शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांनी शेवटच्या क्षणाला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत भाजप उमेदवार कपिल पाटील याना असणारा विरोध कायम ठेवला असून युतीत बिघाडी असल्याचे दाखवून दिले आहे परंतु, निवडणुक लढविण्या बाबतचा निर्णय मतदार संघातील नागरिकांशी बोलून शुक्रवारी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले .  

भिवंडी :  भिवंडी लोकसभेत शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांनी शेवटच्या क्षणाला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत भाजप उमेदवार कपिल पाटील याना असणारा विरोध कायम ठेवला असून युतीत बिघाडी असल्याचे दाखवून दिले आहे परंतु, निवडणुक लढविण्या बाबतचा निर्णय मतदार संघातील नागरिकांशी बोलून शुक्रवारी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले .  

सुरवातीपासून भाजपा खासदार कपिल पाटील यांना विरोध कायम ठेवत सुरेश म्हात्रे यांनी निवडणूक लढविणाराच असा निर्धार जाहीर केला होता दरम्यान काँग्रेस कडून उमेदवारी मिळविण्यासाठी शिवसेनेत राहून प्रयत्न केल्या नंतर त्यात अपयश आल्याने सुरेश म्हात्रे यांना अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला. "माझा विरोध कपिल पाटील याना असून, किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास आमदार सुनील राऊत यांनी बंडखोरीची धमकी दिल्याने उमेदवार बदलू शकतो तर हीच भूमिका भिवंडी साठी लावावी अशी मागणी सुरवातीपासून मागणी होती. ग्रामीण भागातील शिवसैनिकांवर खोट्या केसेस करून त्यांना संपविण्याची भाषा करणा-या कपिल पाटील यांच्या विरोधात मी शिवसेनेसाठी, शिवसैनिकांसाठी लढत असून येत्या दोन दिवसात मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा करून मी माझा निर्णय शुक्रवारी जाहीर करणार आहे," असे म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या पत्रकार परिषदेस सुरेश म्हात्रे समर्थकांनी गर्दी केली होती, परंतु त्यांच्या समर्थनार्थ एकही शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित नव्हता. या पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले, "खासदार कपिल पाटील यांनी येथील जनतेला फक्त आश्वासनांचे गाजर दिले असून त्यांनी केंद्र सरकार कडून कोणतेही काम या लोकसभा क्षेत्रात केले नसताना राज्य सरकारच्या एमएमआरडीए च्या माध्यमातून झालेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी त्यांचा आटापिटा असतो. मग ती कामे स्थानिक आमदार, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झाली असली तरी ती आपण केल्याचा खोटा दावा त्यांच्या कडून सुरु आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील जुने गोदाम बांधकाम नियमित करण्यासाठी सहा सहा वेळा मुख्यमंत्र्यां सोबत भेट घेत फोटो काढून घेतले पण तो प्रश्न सोडवली नाही , शहराचा जीवनदायी उद्योग असलेल्या यंत्रमाग व्यवसाया साठी कोणतेही ठोस उपाययोजना केल्या नाहीत, कोणतेही पॅकेज आणले नाही , शहापूरच्या पाणी प्रश्नावर त्यांनी काही काम केले नसून मुरबाड , बदलापूर येथील समस्या सुद्धा सोडविल्या नसून त्यामुळे माझी भूमिका खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात आहे."

"मी शिवसैनिक असून काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्य सुध्दा  नाही त्यामुळे मी काँग्रेस उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो हे चुकीचे आहे. कपिल पाटील यांच्या विरोधातील राग,चीड तसेच २००९ मध्ये काँग्रेसचे सुरेश टावरे  यांनी कोणतेही काम न केल्याने कोणी माझ्या उमेदवारी साठी आग्रह धरला असेल तर त्यास मी कसा जबाबदार आहे," असा प्रश्न म्हात्रे यांनी उपस्थित केला.

संबंधित लेख