bhise mla and latur | Sarkarnama

रेणापूरमध्ये आमदार भिसेंना आंदोलकांची धक्काबुक्की, गाडीचा काचाही फोडल्या

सुधाकर दहिफळे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

रेणापूर : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे आमदार ऍड. त्र्यंबक भिसे यांना गुरूवारी (ता. नऊ) मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. संतप्त आंदोलकांनी त्यांच्या गाडीची तोडफोडही केली. या घटनेनंतर वातावरण काही काळ तणावग्रस्त झाले. काहींनी मध्यस्थी करून आमदार भिसे यांना तेथून बाहेर काढून गव्हाण रस्त्यावर आणून सोडले. 

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. बंद दरम्यान रेणापूर येथील पिंपळफाटा येथे मराठा समाजाच्या वतीने सकाळपासूनच ठिय्या व रास्ता रोको आंदोलन सुरु होते. यावेळी आमदार भिसे हे आंदोलनात सहभागी होण्यासाठी पिंपळफाटा येथे आले. गाडीतून उतरुन आंदोलकांसमोर बोलत असताना काहींनी "तुम्ही अगोदर आमदारकीचा राजीनामा द्या, त्यानंतर आमच्याशी बोला' अशी मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला. यातूनच संतप्त आंदोलकांनी आमदार भिसे यांना धकाबुक्की केली. याच दरम्यान काहींनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदार भिसे यांनी तेथून काढता पाय घेतला. यामुळे पिंपळफाट्यावर काही वेळ वातावरणात तणाव निर्माण झाला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख