भिमाशंकरच्या अध्यक्षपदाची निवडणूक : वळसे-आढळरावांची प्रतिष्ठा पणाला

दाखवायला कटुता आणि राजकारणात सोयिस्करपणा याचा वस्तुपाठ देणा-या आंबेगावच्या राजकारणाची कसोटी पाहणारी निवडणूक गुरुवारी (दि.२२) भिमाशंकर देवस्थान ट्रस्ट अध्यक्षपदाच्या निमित्ताने होणार आहे. कारण एकमेकांबद्दल कधी बोलायचे आणि कधी मौन पाळायचे याचा वस्तूपाठ देणारे जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि खासदार शिवाजीराव आढळराव हे दोन्ही नेते उद्याच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणार आहेत. आत्तापर्यंत कधीच एकमेकांसमोर थेटपणे उमेदवार म्हणून उतरले नसलेले दोघे नेमके काय करतात आणि निकाल काय लागतो यावर आंबेगाव विधानसभा मतदार संघाबरोबरच खेड लोकसभा मतदार संघाचेही राजकारण अवलंबून असणार आहे.
भिमाशंकरच्या अध्यक्षपदाची निवडणूक : वळसे-आढळरावांची प्रतिष्ठा पणाला

शिक्रापूर : दाखवायला कटुता आणि राजकारणात सोयिस्करपणा याचा वस्तुपाठ देणा-या आंबेगावच्या राजकारणाची कसोटी पाहणारी निवडणूक गुरुवारी (दि.२२) भिमाशंकर देवस्थान ट्रस्ट अध्यक्षपदाच्या निमित्ताने होणार आहे. कारण एकमेकांबद्दल कधी बोलायचे आणि कधी मौन पाळायचे याचा वस्तूपाठ देणारे जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि खासदार शिवाजीराव आढळराव हे दोन्ही नेते उद्याच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणार आहेत. आत्तापर्यंत कधीच एकमेकांसमोर थेटपणे उमेदवार म्हणून उतरले नसलेले दोघे नेमके काय करतात आणि निकाल काय लागतो यावर आंबेगाव विधानसभा मतदार संघाबरोबरच खेड लोकसभा मतदार संघाचेही राजकारण अवलंबून असणार आहे.  

कधीकाळी बंधुतुल्य मैत्री राहीलेले आणि राजकारणात गेली १३ वर्षे एकमेकांबद्दल प्रचंड कटुता दाखवणारे जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि खासदार शिवाजीराव आढळराव या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेल्या भिमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी (दि.२२) होणार आहे. अर्थात एरवी एकमेकांबाबत सोयिस्करपणे राजकारण करीत असल्याचा आरोप असलेल्या दोघांचीही या निवडणुकीत केवळ कसोटीच लागणार नाही तर खेड व आंबेगाव मधील राजकारणावरही त्याचे मोठे पडसाद पडणार आहेत. अर्थात एकमेकांबद्दल कधी बोलायचे आणि कधी मौन पाळायचे याचा वस्तूपाठ दोघांनीही पुणे जिल्ह्याच्या राजकारणात दोघांनीही घालून दिला असला तरी उद्याच्या निवडीत दोघांच्या सोयिस्कर राजकारणाचा नेमका अर्थ जिल्ह्याला समजणार आहे. 

भिमाशंकर देवस्थान हे बारा ज्योतिर्लिंगापैकी वर्षभर मोठ्या गर्दीचे आणि वर्षाकाठी जवळपास तीन ते चार कोटी रुपये एवढ्या चांगल्या महसुलाचे देवस्थान. या देवस्थावर अध्यक्ष असणे जसे मानाचे तसेच राजकारणासाठीही ते सोयीचे. त्यामुळेच की काय देवस्थानवर खेड तालुक्यातील अध्यक्ष व्हावा अशी मागणी खेड तालुक्याची असून ती आंबेगावकरांनी पूर्ण होवू दिली नसल्याचाही आरोप नेहमी होत असतो. 

गुरव, ब्राम्हण आणि शासकीय अशा तीन स्वतंत्र ट्रस्टचे एकत्रीकरण करुन सन २००० मध्ये स्थापन झालेल्या या देवस्थान ट्रस्टवर जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील अध्यक्ष असून अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत यापूर्वी कधीच चर्चा झाली नाही. मात्र यावेळी भाविकांचे प्रतिनिधी म्हणून खासदार शिवाजीराव आढळराव विश्वस्तपदी गेल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा चांगलीच जोरात असून उद्याच्या निवडणुकीत नेमके काय होते त्याची उत्सुकता आहे. 

दरम्यान वर्ष-दीडवर्षावर लोकसभा-विधानसभा निवडणुका येवून ठेपलेल्या असून वळसे पाटील आणि आढळराव पाटील यांनी आपापले राजकीय स्थान भक्कम करुन ठेवले आहे. हे दोघे एकमेकांच्या समोर कधीच उमेदवार म्हणून ठाकलेले नाहीत. आपल्याला अडचण किंवा मित्राची सोय म्हणून कमकुवत उमेदवार देण्यावरुन होणारी चर्चा नेहमीच होते. यावेळी मात्र अध्यक्षपदाची चर्चा दोघांभोवतीच असून सोयिस्कर राजकारणाचा वस्तूपाठ आता दोघेही कसा देतात त्याची उत्सुकता तमाम शिरुर लोकसभा मतदार संघाला असणार हे नक्की. 

शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीच्या पार्श्वभूमीवर...?
काँग्रेस आणि भाजपा हे राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत कसे वागतात हे नव्याने सांगायला नको. महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष शहर-ग्रामीण अशा दोन्ही भागात चांगलेच प्रस्थापित आहेत. काँग्रेस-भाजपाला बाजुला ठेवून आपण युती करावी, अशाही घडामोडी खाजगीत सुरू असल्याची चर्चा आहे. भलेही काँग्रेससोबत जाण्याचे राष्ट्रवादीने जाहिर केले असले तरी येत्या वर्षभरात पूलाखालुन बरेच पाणी वाहून जाणार असून भिमाशंकरच्या निवडीच्या राजकारणावरुनही या घडामोडींचा बराचसा अंदाज बांधणे शक्य होणार आहे हे नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com