bhim army rawan no entry in pune | Sarkarnama

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद रावण यांना पुण्यात बंदी 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 डिसेंबर 2018

 मुंबई : भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद रावण यांची मुंबईतील सभा रद्द झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी पुण्यातही जाण्यासाठी बंदी केली आहे.त्याच बरोबर त्यांना मालाड येथील एका हॉटेल मध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले असून त्या 500मीटर परीसरात जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. 

मुंबई पोलिस चंद्रशेखर आझाद रावण यांना विमानात बसवून देणार असल्याचे समजते. वरळी येथील जांबोरी मैदानावर आज भिमआर्मीची सभा होणार होती.या सभेला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली नाही.त्यानंतर 30 डिसेंबरला पुण्याच्या सावीत्रीबाई फुले विद्यापिठात व्याख्यान आणि 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभावर हॅलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी 2 जानेवारी रोजी लातूर येथे आणि 4 जानेवारी रोजी अमरावती येथे सभा होणार होती. 

राज्यातील या कार्यक्रमासाठी चंद्रशेखर शुक्रवारी मुंबईत दाखल झाले होते.ते मालाड येथील मनाली हॉटेल मध्ये राहात होते.त्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले असल्याचा आरोप करणारा व्हिडीओ त्यांनी व्हायरल केला आहे.मोदी सरकारने हे युध्द सुरु केले असून त्याचा अंत भिम आर्मी करेल असा इशाराही त्यांनी या व्हिडीओ मध्ये दिला आहे. 

आझाद यांना सभेची परवानगी नाकारल्या बद्दल विरोधी पक्षांकडून निषेध करण्यात आला आहे.भाजप सरकारची ही हूकूमशाही मोडून काढू.भिमा कोरेगाव मध्ये दंगली घडवण्याचा भाजपचा डाव असून यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र सचिव कॉ. प्रकाश रेड्डी यांनी केला. 

संबंधित लेख