bhim army in maharastra | Sarkarnama

भीम आर्मीची  महाराष्ट्रात स्थापना 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 18 जून 2017

मुंबई : उत्तर प्रदेशात सहारनपूर येथे मुख्यमंत्री योगी यांच्या काळात सुरू झालेल्या दलितांवरील अत्याचाराला रोखण्यासाठी व त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी उदयास आलेल्या भीम आर्मीचे निळे वादळ राज्यातही धडकले आहे. चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून भीम आर्मीची आज राज्यात स्थापना करण्यात आली. 

राज्यात दलितांची राजकीय ताकद कमी झालेली असतानाच विविध संघटनाही राज्यात रोज होत असलेल्या दलितांवर अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी अपयशी ठरल्या आहेत, या पार्श्वभूमीवर राज्यात भीम आर्मीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती अशोक कांबळे यांनी दिली. 

भीम आर्मीच्या राज्य अध्यक्षपदी अशोक कांबळे, मुंबई अध्यक्षपदी ऍड. रत्नाकर डावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायद्याने अन्याय अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास त्याविरोधात आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. यावेळी भीम आर्मीचे केंद्रीय प्रसार आणि प्रचार प्रमुख राकेश यादव उर्फ राकेश भीम, मध्यप्रदेशमधील दत्ता मेढे तसेच कुंदन गोटो,नितीन मोरे आदी उपस्थित होते.  

संबंधित लेख