BHIM app launched | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

भीम-आधार ऍपचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी भीम-आधार ऍप आणले असून हे ऍप जगातील एकमेवाद्वितीय आहे.

 - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

नागपूर : कमीतकमी चलनाचा वापर करून डिजिटल व्यवहारात वाढ होणे हाच विकासाचा नवा मूलमंत्र असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात डीजीधन मेळावा तसेच प्रधानमंत्री आवास योजनेची सुरवात झाली. तसेच आयआयएम, ट्रिपल आयटी व एम्स या संस्थांच्या इमारतीचे भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते या वेळी झाले. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल, महापौर नंदा जिचकार उपस्थित होते. 

या वेळी पंतप्रधानांनी डिजिटल व्यवहाराचे जोरदार समर्थन केले. आता काळानुसार बदलण्याची गरज असल्याचे सांगून ते म्हणाले, चलनाच्या छपाईमध्ये व चलनाची ने-आण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. डिजिटल व्यवहारामध्ये वाढ झाल्यास हा खर्च गरिबांच्या विकासासाठी खर्च करता येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी भीम-आधार ऍप आणले असून हे ऍप जगातील एकमेवाद्वितीय असल्याचा दावाही त्यांनी केला. आफ्रिकेतील अनेक देशांनी भीम-आधार ऍपचे तंत्रज्ञान भारताला मागितल्याचेही त्यांनी सांगितले. 

तरुणांना संधी 
तरुणांनी आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वेळ न दवडता भीम-आधार ऍपचे ग्राहक केल्यास त्यासाठी मोबदला देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. एक भीम-आधार ऍपने व्यवहारासाठी मन वळविणाऱ्या तरुणांना 10 रुपये देण्यात येतील. दुकानदार किंवा व्यापाराला भीम-आधार ऍप समजावून दिल्यास 25 रुपये दिले जातील, असेही त्यांनी सांगितले. 

संबंधित लेख