संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी विधानपरिषदेत गोंधळ 

संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी विधानपरिषदेत गोंधळ 

नागपूर ः संभाजी भिडे यांच्या वक्‍तव्याची तपासणी करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भिमा कोरगाव प्रकरणी शरद रणपिसे तसेच ऍड. जयदेव गायकवाड यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर ते बोलत होते. 

भिमा कोरेगाव प्रकरणी पूजा सकट या मुलीची हत्या करण्यात आली त्यासोबतच तेथील दंगलीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधानपरिषद सदस्य रणपिसे व गायकवाड यांनी केली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानुसार, पुजा सकट हिचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा शवविच्छेदन अहवाल आला आहे. परंतू सकट कुटूंबीयांचा जागेचा वाद असल्याने याप्रकरणात तिच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दोघांना अटक करुन त्यांची नंतर जामीनावर सुटका झाली. 

याप्रकरणात नऊ कोटी रुपयांची मदत जाहिर करण्यात आली आहे. त्यासोबतच संभाजी महाराज समाधीस्थळ तसेच विजयस्तंभ सुशोभीकरणाचा प्रस्तावही तयार करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. विजयस्तंभानजीक असलेल्या अतिक्रमण हटविण्यात आले आहे. एल्गार परिषदेशी नक्षलवाद्याचा संबंध जोडत काही निरपराध व्यक्‍तींना अटक करण्यात आली; मात्र बेजबाबदार वक्‍तव्य करुन दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिंडे यांना सरकार संरक्षण देत असल्याचा आरोप या दरम्यान राष्ट्रवादी कॉग्र्रेसचे सुनील तटकरे, प्रकाश जगताप, विद्या चव्हाण यांच्यासह अनेक सदस्यांनी केला. 

त्यावर कायद्यापुढे सर्व सारखेच असून वक्‍तव्याची तपासणी करुन याप्रकरणी कारवाई केली जाईल. भिमा कोरेगाव प्रकरणी विशेष न्यायालयीन चौकशी समिती गठीत आहे. तीची मुदत संपत असतानाच ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या विनंतीवरुन ती वाढविण्यात आली आहे. 

विरोधकांचा गोंधळ 
संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी करीत विरोधकांन गोंधळ घातला, घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ सभागृहाचे कामकाज तहकुब करण्यात आले.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com