bhide guruji and chandrakant patil meeting in kolhapur | Sarkarnama

भिडे गुरुजी आल्याचे कळताच चंद्रकांतदादांनी बैठक अर्ध्यावरच थांबवली! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

बैठक सुरु असतानाच शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे याठिकाणी आले. त्यावेळी मंत्री पाटील यांनी आढावा बैठक अर्ध्यावरच थांबवून भिडे यांच्याशी तासभर चर्चा केली. 

कोल्हापूर: जिल्हा परिषदेत भाजप व मित्रपक्षांच्या सत्तेला सव्वा वर्ष पूर्ण झाले आहे. या कालावधीत काय कामे झाली आणि आणि आगामील लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणत्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे, याचा आढावा घेण्यासाठी सोमवारी पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्यांची सर्किट हाउस येथे बैठक घेतली.

ही बैठक सुरु असतानाच शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे याठिकाणी आले. त्यावेळी मंत्री पाटील यांनी आढावा बैठक अर्ध्यावरच थांबवून भिडे यांच्याशी तासभर चर्चा केली. 

पालकमंत्री पाटील हे तीन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी सोमवारी त्यांनी जिल्हा परिषद सदस्यांची आढावा बैठक आयोजित केली होती. ही बैठक सुरु असतानाच संभाजी भिडे या ठिकाणी आले. त्यांच्याबरोबर बरेच कार्यकर्ते होते. यावेळी मंत्री पाटील यांनी आढावा बैठक अर्ध्यावरच थांबवली. त्यांनी भिडे यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. भिडे यांची जिल्ह्यात होणारी सभा होवू देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मंत्री पाटील व भिडे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याचा मात्र तपशील उपलब्ध झाला नाही. 

संबंधित लेख