bhide cm news | Sarkarnama

संभाजी भिडेंचा नामोल्लेख मुख्यमंत्र्यांनी टाळला 

गोविंद तुपे
मंगळवार, 13 मार्च 2018

मुंबई : भिमा कोरेगाव घटनेला जबाबदार मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर कारवाईची मागणी मागील आठवड्यातील चर्चेच्या वेळी विधान परिषदेतील सदस्यांनी लावून धरली होती. मात्र आज भिमा कोरेगाव संदर्भात उत्तर देताना मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांचा नामोल्लेख जाणीव टाळल्याचे चित्र विधान परिषदेत पहायला मिळाले. 

भीमा कोरेगावची घटना आणि त्यानंतर राज्यात झालेल्या बंदनंतर आंबेडकरी समाजातील शेकडो तरुणांणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्याला जबाबदार असलेल्या मिलिंद एकबोटे- संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भात मागील आठवड्यात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी चर्चा उपस्थित केली होती. त्यावर आज मुख्यमंत्र्यानी उत्तर देताना सविस्तर उत्तर देत असताना संभाजी भिडे यांच्या नावाचा उल्लेख करणे टाळले. 

मुख्यमंञ्यांच्या उत्तरानंत बोलण्यासाठी उभे राहिलेल्या विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तर मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे माध्यमांवर प्रतिक्रिया देत फिरत होते पण त्यांना अटक का केली नाही, ही दंगल सरकार पुरस्कृत होती का असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला. त्यानंतर इतर सदस्यांनीही भिडेंचे नाव घेऊन प्रति प्रश्न केले, परंतू यामध्ये जे दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई होईल असे सर्वांनाच सरकारी खाक्‍यातले उत्तर मुख्यमंञ्यांनी दिले. एवढेच नाही तर अखेर पर्यंत त्यांनी भिडेंचा नामोल्लेख केला नाही.

संबंधित लेख