पार्थ पवारांच्या पराभवात सिंहाचा वाटा उचलल्यामुळे भेगडेंना मंत्रिपद

पार्थ पवारांच्या पराभवात सिंहाचा वाटा उचलल्यामुळे भेगडेंना मंत्रिपद

पिंपरी : एकनिष्ठता,प्रामाणिकपणा आणि लोकसभेला मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार यांच्या विरोधात शिवसेनेला दिलेले लीड यामुळे मावळचे आमदार बाळा ऊर्फ संजय भेगडे यांना मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे मावळात उत्साह आहे. तर, मंत्रिपदाचे गाजरच मिळाल्याने मावळचा शेजारी पिंपरी-चिंचवडमध्ये,मात्र निरुसात्सह व नाराजी पसरली आहे. 

21 वर्षानंतर मावळाला मंत्रिपद मिळाले आहे.तर, पिंपरी-चिंचवडला अजून त्याची प्रतीक्षाच आहे. एकनिष्ठ, प्रामाणिक कार्यकर्ता व त्याच्याजोडीने नुकत्याच झालेल्या लोकसभेला मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना भेगडेंच्या मावळ विधानसभा मतदारसंघाने 21,827 मतांची आघाडी दिली. ती सुद्धा त्यांना मंत्रिपद मिळण्यास उपयोगी ठरली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांना मंत्रिपद मिळेल, अशी आशा होती. तशी चर्चा गेली दोन वर्षे सुरू होती. त्यांच्याजोडीने भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचेही नाव घेतले जात आहे. मात्र, पालिकेत भाजपची प्रथमच सत्ता आणण्यात व लोकसभेला युतीच्या उमेदवारांना भरभक्‍कम लीड देऊनही या दोघांनाही मंत्रिपदासाठी डावलण्यात आल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत.

भेगडेंना मंत्रिपद मिळाल्याने मावळात उत्साह असताना त्याशेजारी पिंपरी-चिंचवडमध्ये,मात्र ते न मिळाल्याने निरुत्साह पसरलेला आहे. अगदी मावळजवळ येऊन मंत्रीपदाने उद्योगनगरीला अखेर हुलकावणीच दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com