bhavani talwar in satara | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

साताऱ्यात भवानी मातेच्या तलवारीची दसरा मिरवणूक उत्साहात

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

खासदार उदयनराजे भोसले यांचे निवासस्थान असलेल्या जलमंदिर पॅलेस येथे श्री भवानी मातेचे तलवारीचे पूजन झाल्यानंतर तेथून दसरा मिरवणुकीस सायंकाळी सुरवात झाली. मिरवणुकीत खासदार उदयनराजे भोसले, त्यांचे सुपुत्र विरप्रतापसिंहराजे भोसले, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी, तसेच सातारकर नागरिक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. 

सातारा : घोड्यांवर स्वार बाल शिवाजी आणि त्यांचे मावळे, सजवलेल्या बैलगाड्या आणि झांज पथक आणि ढोल लेझीम अशा शाही थाटात सातारा शहरातून श्री भवानी मातेच्या तलवारीची दसरा मिरवणूक शानदारपणे काढण्यात आली. 

खासदार उदयनराजे भोसले यांचे निवासस्थान असलेल्या जलमंदिर पॅलेस येथे श्री भवानी मातेचे तलवारीचे पूजन झाल्यानंतर तेथून दसरा मिरवणुकीस सायंकाळी सुरवात झाली. मिरवणुकीत खासदार उदयनराजे भोसले, त्यांचे सुपुत्र विरप्रतापसिंहराजे भोसले, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी, तसेच सातारकर नागरिक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. 

राजपथावरून ही शाही दसरा मिरवणूक पोवईनाक्‍यावर आली. येथे ऐतिहासिक भवानी तलवारीचे पूजन खासदार उदयनराजे भोसले व सुपुत्र विरप्रतापसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. सनई चौघडा आणि तुतारीच्या निनादात भवानी मातेचे तलवारीचे पूजन झाले. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्या सोबत सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला. नागरिकांनी उदयनराजे यांना आपट्याची पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. 

संबंधित लेख