Bhavana Gavali Birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : भावना गवळी 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 मे 2017

सलग चारदा लोकसभेत निवडून गेलेल्या भावना गवळी या शिवसेनेच्या विदर्भातील एकमेव महिला खासदार आहेत.

सलग चारदा लोकसभेत निवडून गेलेल्या भावना गवळी या शिवसेनेच्या विदर्भातील एकमेव महिला खासदार आहेत.

1999 पासून सातत्याने लोकसभेत शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांचे वडील पुंडलिकराव गवळी वाशिम मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर भावना गवळी यांना उमेदवारी मिळाली. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी त्या वाशिम मतदारसंघातून निवडून आल्या. 2004 त्यांनी मनोहर नाईक यांचा पराभव केला.

मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर त्यांनी यवतमाळ लोकसभा मतदारसंघ निवडला. या मतदारसंघातून 2009 मध्ये हरीभाऊ राठोड यांचा तर गेल्या निवडून कॉंग्रेसचे नेते शिवाजीराव मोघे यांचा पराभव केला. रिसोड (जि. वाशिम) या भागात त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या आहेत.

संबंधित लेख