bhausaheb phundkar ministar in state | Sarkarnama

कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्यावर फुलांचा वर्षाव

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 जून 2017

बुलडाणा : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यात बुलडाण्यात दाखल झालेले कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्यावर ठिक-ठिकाणी सत्कार सोहळ्यामध्ये फुलांचा वर्षावर करण्यात येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांची झालेली दैनावस्था दुर करून कर्जमाफी करण्यासाठी गत दोन-तीन महिन्यांपासून विरोधी पक्षांसह शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटनांसह विविध संघटनांनी आंदोलनाचा एल्गार पुकारला होता. 

शेतकऱ्यांच्या आंदोलनाची वाढती धग लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली. राज्यमंत्रीमंडळात कृषी खाते सांभाळणारे भाऊसाहेब फुंडकर यांचीही या कर्जमाफीच्या घोषणेत महत्वाची भुमिका राहिली आहे. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर पहिल्यादाच आपल्या जिल्ह्यात बुलडाण्यात दाखल झालेले कृषीमंत्री फुंडकर यांचा ठिक-ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे.

जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, विधानसभा अध्यक्ष योगेंद्र गोडे, राज्य प्रवक्‍त्या श्वेता शालिनी, तालुकाध्यक्ष मोहन पवार, जिल्हा परिषदेच्या सभापती श्वेता महाले आदींच्या उपस्थितीत जिल्ह्यात वरवंड, भादोला, बुलडाण्यासह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी फुंडकर यांचा सत्कार केला. 

स्वातंत्र्यानंतरची सर्वांत मोठी ऐतिहासिक शेतकऱ्यांची कर्जमाफी राज्य शासनाने केली आहे. कर्जमाफीचा अध्यादेश आज निघणार असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ उद्यापासून मिळणार असल्याचे कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी सांगितले. कर्जमाफीमुळे राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

शासनाने थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा दीड लाख रूपये तर कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना 25 हजारांची मदत मिळणार आहे. शासन तूर खरेदीबाबत गंभीर असून, जेवढ्या तुरीची नोंदणी झाली आहे, तेवढी तूर खरेदी करण्यात येणार असल्याचे फुंडकर यांनी सांगितले. 

संबंधित लेख