bhaskar jadhav speech in khed | Sarkarnama

तटकरे रायगड सांभाळा, मी रत्नागिरी सांभाळतो!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

मला न केलेल्या घोटाळ्यात या सरकारने अडकवले. चमणकरला अद्याप एकही पैसा दिलेला नाही. परंतु त्यांना वाटलं की हा भुजबळ परत केव्हाच बाहेर येणार नाही. परंतु भुजबळ साधासुधा नाही. हा लढवय्या आहे, असे सांगताना भुजबळ गहिवरले. "ना राम ना रहीम खतरे में है, पुरा देश खतरे मै है' अशी टीका छगन भुजबळांनी केली.
 

खेड (रत्नागिरी): लोकसभेची उमेदवारी माझे मित्र सुनील तटकरे यांना मिळाली आहे. तटकरेसाहेब तुम्ही एकटे नाहीत. माझी तुम्हाला सदैव साथ असेल. प्रचाराची राळ उठेल त्यावेळी तटकरे-जाधव जोडी विरोधकांना सैरभैर करून सोडेल. त्यावेळी सारा हिशोब आम्ही दोघे मिळून चुकता करू,' अशी ग्वाही भास्कर जाधव यांनी जाहिररित्या दिली. 

"तटकरे, रायगड तुम्ही सांभाळा, मी रत्नागिरी संभाळतो,' अशी पुस्तीही त्यांनी जोडली. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेत ते बोलत होते. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा थेट परिणाम कोकणच्या पर्यटनावर होऊ लागला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

ते म्हणाले, "गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत कोकणात अनेक खून झाले. गृहखाते मुख्यंमत्र्यांकडे आहे. त्यांचा वचक राहिलेला नाही. चिपळूण येथे रामदास सावंत, खेड येथे अंकिता जंगम, अंकिता चव्हाण, गुहागरमध्ये सकपाळ बंधू यांचा खून झाला. यामुळे पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवायला सुरवात केली आहे. अद्यापही या साऱ्या घटनांमध्ये आरोपी हाती लागलेले नाहीत. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोऱ्या झाल्या. परंतु चोरटे पकडले गेले नाहीत. अंकिता जंगम खुनानंतर समस्त जंगम समाज खेड येथे उपोषणासाठी बसला. पोलिस अधीक्षकांनी खेडमध्ये येऊनही उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही. त्यामुळे संपूर्ण यंत्रणेवरचा विश्‍वास उडाला आहे.'' 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख