bhaskar jadhav ncp | Sarkarnama

आजचा वाढदिवस : भास्कर जाधव, आमदार गुहागर, माजी मंत्री. 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

शिवसेनेचे गुहागर तालुका प्रमुख, रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख, एस.टी. कामगार संघटना, भारतीय कामगार सेना आदी एक नव्हे तर अनेक महत्त्वाच्या पदावर काम केलेले भास्कर

शिवसेनेचे गुहागर तालुका प्रमुख, रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख, एस.टी. कामगार संघटना, भारतीय कामगार सेना आदी एक नव्हे तर अनेक महत्त्वाच्या पदावर काम केलेले भास्कर
जाधव हे हाडाचे शिवसैनिक होते. या कामाची दखल घेऊन शिवसेनेने त्यांना 1995 मध्ये विधानसभेची उमेदवारी दिली आणि ते चिपळूण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडूनही आले. 2004 पर्यंत शिवसेनेचे आमदार होते. शिवसेनाच्या अंतर्गत वादातून त्यांनी पुढे शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. अपक्ष म्हणून ते मैदानात उतरले आणि निवडूनही आले. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना अशा मातब्बर उमेदवारांचा पराभव केला होता. 2005 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. नंतर ते विधानपरिषदेचे सदस्य झाले. 2009 व 2014 विधानसभा निवडणुकीत त्यांनी गुहागर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले. राष्ट्रवादीने त्यांना आघाडी सरकारमध्ये मंत्री केले तसेच पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांना संधी दिली. ज्या ज्या पदावर जाधव यांनी काम केले तेथे तेथे ते यशस्वी झाले असे त्यांच्याविषयी नेहमीच बोलले जाते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख