bhaskar jadhav ncp | Sarkarnama

आजचा वाढदिवस : भास्कर जाधव, माजी मंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेस. 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

 

 

भास्कर जाधव यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेकडून सुरू झाली. जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता, चिपळूणचे आमदार, त्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करून हार व त्यानंतर पुन्हा आमदार. राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष आणि सध्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीची सूत्रे व आमदार, अशी त्यांची कारकीर्द आहे. युतीच्या काळात उत्कृष्ट संसदपट्टू म्हणून त्यांना गौरविण्यात आले. शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेल्यानंतर ते विधानपरिषदेत आमदार झाले. भाजपच्या बालेकिल्ल्यात धक्का देत गुहागरातून दोनवेळा आमदार झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ते पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदापर्यंत त्यांनी मजल मारली. आघाडी सरकारच्या काळात 9 खात्याचे राज्यमंत्री, नंतर कामगारमंत्री व विधानसभेतील तालिका समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. आंबा, काजू उत्पादक, बागायतदार, मच्छीमार, माजी सैनिक व भंडारी समाजातील व्यावसायिकांचे प्रश्‍न त्यांनी वेळोवेळी सभागृहात मांडले. मंडणगड, देवरूख आणि गुहागर शहरातील ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रुपांतर करण्याचा निर्णय त्यांच्या मंत्रीपदाच्या कारकीर्दीत झाला होता. 

 

संबंधित लेख