Bharne abuses Harshavardhan Patil | Sarkarnama

अर्वाच्च भाषेत दत्तात्रय भरणे यांची हर्षवर्धन पाटील यांची टीका

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 मे 2017

पुणे - इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे आणि कॉंग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या दोघांतील शाब्दिक युद्ध चांगलेच पेटले आहे. शेतकऱ्यांशी बैठकीत बोलताना भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याविषयी शिवराळ भाषा आणि शिवीगाळ केली. त्याची "क्‍लिप' व्हायरल झाली. त्यामुळे या वादात भर पडली. भरणे यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.

खडकवासला धरणाच्या कालव्यातून इंदापूरच्या शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याबद्दल हर्षवर्धन हे गेले काही दिवस भरणे यांच्यावर टीका करीत आहेत. या पाण्यासाठी येथील शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चाही त्यांनी आज काढला. या मोर्चाच्या तयारीसाठी हर्षवर्धन यांनी गावोगावी बैठका घेतल्या. त्यात भरणे यांच्यावर टीका केली. काल महाराष्ट्र दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात भरणे यांना काही शेतकऱ्यांनी तरंगवाडी तलावाला पुरेसे पाणी मिळत नसल्याबद्दल तक्रार केली. भरणे हे यावर विविध कारणे सांगत असतानाही शेतकरी आपला मुद्दा सोडण्यास तयार नव्हते.

गेल्या वर्षी तुम्हाला पाणी दिले होते की नाही, असा प्रश्‍न भरणे यांनी विचारल्यावर त्याबद्दल तुमचा आम्ही सत्कारही केला होता की, असा सवाल-जवाबही शेतकरी आणि भरणे यांच्यात रंगला. "मी विरोधी पक्षाचा आमदार आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे,''अशी सावरासावर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तरी शेतकरी ऐकेनात म्हटल्यावर, त्या इंजिनिअरला मी आईमाईवरून शिव्या दिल्या,''असाही दावा भरणे यांनी केला. शेवटी त्यांची जीभ हर्षवर्धन पाटील यांच्यावर घसरली. त्यांचा एकेरी उल्लेख केला व शिवीही त्यांनी दिली. या प्रसंगाचे चित्रीकरण साहजिकच एका कार्यकर्त्याने केले. ते तालुकाभर व्हायरल झाले.

यामुळे कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणखी चिडले. त्यामुळे पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील आजचा जनआक्रोश मोर्चा जोरदार निघाला. भरणे हे अकार्यक्षम आमदार असून, तो झाकण्यासाठीच ते असा अर्वाच्चपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

संबंधित लेख