...तर मुख्यमंत्र्यांना कळवेन; भारती पवारांची अधिकाऱ्यांना तंबी

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी आणि सत्काराची निमंत्रणे नवी नाहीत. मात्र, भाजपच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी हे सर्व बाजुला ठेवत मतदारसंघातील दुष्काळी भागांचा दौरा सुरु केला आहे. आज त्यांनी मालेगावला बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले.
...तर मुख्यमंत्र्यांना कळवेन; भारती पवारांची अधिकाऱ्यांना तंबी

मालेगाव : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी आणि सत्काराची निमंत्रणे नवी नाहीत. मात्र, भाजपच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी हे सर्व बाजुला ठेवत मतदारसंघातील दुष्काळी भागांचा दौरा सुरु केला आहे. आज त्यांनी मालेगावला बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले. त्या म्हणाल्या, "अन्य कामांत दिरंगाई चालु शकते. दुष्काळाच्या कामांत हयगय नको. तसे केले तर थेट पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांना कळवीन,'' त्यांच्या या आक्रमकतेमुळे दुष्काळाची बैठक चांगलीच गाजली. 

आज सकाळी सोनज (मालेगाव) येथे खासदार डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत दुष्काळ आढावा बैठक झाली. यावेळी नागरीकांनी अनेक तक्रारी केल्या. पाण्याचे टॅंकर सतत विलंबाने येतात. वेळेवर व मागणी करुनही टॅंकर मिळत नाही. जनावरांसाठी अद्याप छावनी झालेली नाही. त्यामुळे हा निर्णय झाला तरी त्यात कालापव्यय होईल. त्यामुळे चार छावनी एैवजी जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे. त्यामुळे शेतकीर चारा खरेदी करुन त्याची व्यवस्था करु शकतील. दुष्काळ निवारणासाठी कायमस्वरुपी व्यवस्था करावी आदी मागण्या केल्या. 

यावेळी दुष्काळाच्या कामातील दिरंगाईमुळे उपस्थितांनी चांगलाच गोंधळ केला. हा गोंधळ शांत करीत खासदार पवार यांनी शेतकरी व नागरीकांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी तहसीलदारांना विविध सुचना केल्या. पाण्याचा टॅंकर व अन्य कामांची अंमलबजावणी ताताडीने करावी. त्यात दिरंगाई नको. हयगय झाली तर थेट मुख्यमंत्र्यांना कळवीन, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दादा जाधव, रत्नाकर पवार, निलेश कापसे, तहसीलदार सी. आर. राजपूत आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com