bharat patankar criticise jalyukta shivar | Sarkarnama

जलयुक्त शिवार योजनेतून लोकांच्या मनात भ्रम पेरण्यात आला!

संपत मोरे
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

१९७३ सालापासून असे प्रयोग होत आहेत.

पुणे : "जलयुक्त शिवार ही नवी योजना नाही, ती जुनीच आहे. पण या योजनेतून दुष्काळ हटेल असा भ्रम तयार केला गेलाय. ज्या भागात पाऊस पडत नाही, तिथं ही योजना सुरु आहे. पाऊसच पडला नाही तर पाणी मुरणार कसं ?आणि साठणार कसं? या योजनेतून लोकांच्या मनात भ्रम पेरण्यात आला आहे," अशी टीका पाणी चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केली.

"१९७३ सालापासून असे प्रयोग होत आहेत. या सरकारने त्याच नाव बदललं आहे. या योजनेच्या नामकरण विधीनंतर सरकारने लोकांच्या मनात भ्रम निर्माण केला आहे. या योजनेनंतर दुष्काळी भागात पाणीच पाणी होईल असं सांगण्यात आलं. पण या तालुक्यात पाऊसच पडत नाही. मग पाणी मुरणार कुठलं? आणि साठणार कस?, असा सवाल पाटणकर यांनी विचारला.

"पाणी योजना पूर्ण व्हाव्यात म्हणून लोकांचे लढे सुरु आहेत. त्या लढ्यांना खीळ बसावी म्हणूनच दुष्काळी लोकांच्या मनात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून भ्रम तयार केला आहे. सरकारने असल्या प्रयोगांपेक्षा अपुऱ्या पाणी योजना पूर्ण करण्याची गरज आहे." असं पाटणकर म्हणाले.
 

संबंधित लेख