bharat patankar and satara | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

कऱ्हाड विमानतळ विस्ताराला इंचही जागा देणार नाही : डॉ. भारत पाटणकर,

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

कऱ्हाड (जि. सातारा) : विमानतळ विस्ताराच्या विरोधावर कृती समिती ठाम असून विस्तारासाठी एक इंचही जागा दिला जाणार नाही. कायद्याप्रमाणे शासनाला दिलेल्या पर्यायानुसार निढळ येथे विमानतळ करून तेथे खुशाल हब उभारावे, असे टोला श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी आज लगावला. 

कऱ्हाड (जि. सातारा) : विमानतळ विस्ताराच्या विरोधावर कृती समिती ठाम असून विस्तारासाठी एक इंचही जागा दिला जाणार नाही. कायद्याप्रमाणे शासनाला दिलेल्या पर्यायानुसार निढळ येथे विमानतळ करून तेथे खुशाल हब उभारावे, असे टोला श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी आज लगावला. 

कऱ्हाड येथील विमानतळ विस्तार विरोधी कृती समितीतर्फे प्रांताधिकारी कार्यालयावर डॉ. पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आज खबरदार मोर्चा काढण्यात आला. कोल्हापूर नाका येथून महात्मा गांधी पुतळ्यापासून मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चात वारूंजी, केसे, मुंढे, पाडळी, गोटे, येथील बाधित शेतकरी सहभागी झाले. जमिन आमच्या हक्काची नाही... कुणाच्या बापाची, शेतकरी एकजुटीचा विजय असो.., विमानतळ विस्तार रद्द झाला पाहिजे... अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

कोल्हापूर नाक्‍याहून शाहू चौक, दत्त चौक मार्गे मोर्चा तहसिल कार्यालयावर आला. मोर्चात महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. कोटींच्या घरात किंमत दिली तरीही एकही इंच जमिन देणार नाही.., लोकांची दिशाभुल केली तर याद राखा..., विकासाशिवाय विमानतळ कसे चालणार ..., आधी औद्योगिक व सर्वांगिण विकास मगच विमानतळ, ते सुध्दा कोरडवाहू जागेतच, भैरवानाथ सहकारी पाणी पुरवठा संस्था वाचलीच पाहिजे...अशा मजकूराचे फलक मोर्चेकऱ्यांच्या हातात होते. प्रांताधिकारी कार्यालयावर गेल्यावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. समितीचे आनंदराव जमाले, श्री. धुमाळ आदींसह बाधित शेतकऱ्यांची भाषणे झाली. 

डॉ. पाटणकर म्हणाले, कोल्हापूर येथे एकदा शेतकऱ्यांना विमान घेऊन गेले. मात्र, त्यानंतर तिथली विमानसेवा बंद आहे. तेथे औद्योगिकरण, पर्यटन असताना विमानसेवा चालत नाही. मग येथे ना पर्यटनाचा विकास ना औद्योगिकरणाचा विकास झाला आहे. त्यामुळे न चालणाऱ्या विमानतळाचे विस्तारकरण रद्द करावे. करायचे झाल्यास कायद्याप्रमाणे निढळच्या (ता. खटाव) माळावर पर्याय दिला असून तेथे ते करावे. मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेणार असून यापुढेही मुख्यमंत्र्यांशीच भेट घेवून चर्चा करू. 
यावेळी डॉ. पाटणकर यांच्यासह कृती समितीच्या सदस्यांनी तहसिलदार राजेंद्र शेळके यांना निवेदन देवून चर्चा केली. 

"श्रमिक' चा महामेळावा 
श्रमिक मुक्ती दलाचा कऱ्हाड येथील पलाश मल्टीपर्पज हॉल येथे राज्याचा महामेळावा 14 सप्टेंबरला होणार आहे. त्यात राज्यभरातून विविध आंदोलनातील कार्यकर्ते येणार असून या महामेळाव्यात कऱ्हाड विमानतळ विस्तार विरोधात ठराव घेण्यात येईल असे सांगून सर्व बाधितांनीही महामेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. पाटणकर यांनी केले. 

 

संबंधित लेख