bharat bhelke mla | Sarkarnama

आजचा वाढदिवस : भारत भालके, आमदार पंढरपूर .

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

भारत भालके यांनी कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना पंढरपूर तालुक्‍यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. 2002 साली ते या कारखान्याचे अध्यक्ष झाले. गेल्या पंधरा वर्षापासून तेच या कारखान्याचे अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. 2004 मध्ये ते पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले. 2004 साली त्यांनी शिवसेनेच्या वतीने पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांचा पराभव झाला परंतु त्यानंतर त्यांनी अधिक जोमाने काम सुरू केले.

भारत भालके यांनी कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना पंढरपूर तालुक्‍यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. 2002 साली ते या कारखान्याचे अध्यक्ष झाले. गेल्या पंधरा वर्षापासून तेच या कारखान्याचे अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. 2004 मध्ये ते पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले. 2004 साली त्यांनी शिवसेनेच्या वतीने पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांचा पराभव झाला परंतु त्यानंतर त्यांनी अधिक जोमाने काम सुरू केले. सन 2009 साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सारख्या दिग्गज नेत्याच्या विरोधात दंड थोपटून निवडून आल्याने "जायंट किलर" म्हणून त्यांना लोक ओळखू लागले. 
मंगळवेढा तालुक्‍यातील दुष्काळी 35 गावांसाठी उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव त्यांनी सादर केला. अनुशेषाची अडचण असताना देखील राज्यपालांकडून विशेष बाब म्हणून श्री.भालके यांनी या प्रस्तावाला मान्यता मिळविली. त्यानंतर सत्तांतर झाल्याने या योजनेसाठी निधीची तरतूद होत नव्हती. त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. येत्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी टोकन निधीची तरतूद केली जाईल असे प्रतिज्ञापत्र शासनाने नुकतेच न्यायालयात दाखल केले आहे. त्यामुळे उपसा सिंचन योजनेचे काम सुरू होण्याच्या दृष्टीने काही प्रमाणात यश आले असल्याचे मानले जात आहे. पंढरपूर शहर विकासाच्या कामासाठी त्यांनी आघाडी सरकारच्या काळात निधी खेचून आणण्याचे सातत्याने प्रयत्न केले. 

संबंधित लेख