bhapkar | Sarkarnama

तुम्हाला लाजा वाटत नाहीत, मेंदू सडलेत का? : भापकरांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 मे 2017

उस्मानाबाद : "एसएओ झोपा काढतात का? तुम्हाला लाजा वाटत नाहीत, मेंदू सडलेत का? बिन कामाच्या बुजगावण्यांमुळे जिल्ह्यातील कामांचा बट्टयाबोळ झालायं अशा शब्दांत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. जलयुक्त शिवार अभियान, मनरेगा, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, मागेल त्याला शेततळे आदी योजने अंतर्गत देण्यात आलेले उदिष्ट गाठण्यात प्रशासनाला अपयश आल्याने विभागीय आयुक्त भडकले होते. कवी मनाच्या भापकरांचा हा रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांचा पाचावर चांगलीच धारण बसली. 

शुक्रवारी (ता. 5) विभागीय आयुक्त भापकर यांनी जिल्ह्यात येऊन कार्यशाळा घेतली. पालिकेच्या नाट्यगृहात झालेल्या बैठकीत त्यांनी खऱ्या अर्थाने अधिकाऱ्यांचा क्‍लास घेतला. जिल्ह्यातील विविध योजनाचे प्रगतीपुस्तक तपासत असतांना त्यातील आकडेवारी पाहून संतापलेल्या भापकरांनी तोंडाचा दांडपट्टा सुरु केला. मनरेगाच्या कामासंदर्भात यापुर्वी दिलेल्या 
सूचनेनंतरही कामात प्रगती नाही हे पाहून आयुक्तांनी जाहीर निराशा व्यक्त केली. इतर जिल्ह्यांमध्ये एक महिला कृषी सहायक तिच्या कार्यक्षेत्रात एका हंगामात मनरेगातून 200 शेततळी पूर्ण करते. पण उस्मानाबाद जिल्ह्यात 50 शेततळे करणारा एकही कृषी सहाय्यक नाही का? असा सवाल आयुक्तांनी उपस्थितांना केला. विहिरींची कामे सुरू नाहीत, फळझाडे लागवडीच्या कामातही निराशाजनक परिस्थती असल्याचे पाहून भापकरांचा मुडच गेला. मजूरांना मजूर नाही तर लाभार्थी म्हणा अशा साध्या सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. शेतावर कामे सुरू करा, चार नंबरचा अर्ज भरून देण्याची गरज ठेवू नका, मोबाईलद्वारे एसएमएस करून लाभार्थ्यांची यादी घ्या, त्यांना योजनेचा लाभ द्या अशा सूचना भापकर यांनी कडक शब्दांत अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यातील अनेक कामे सुरूच झाली नसल्याने निवासी उपजिल्हाधिकारी आणि अधीक्षक, कृषी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देखील विभागीय आयुक्तांनी या ार्यशाळेत दिला. जिल्ह्यातील 97 ग्रामपंचायतींमध्ये यंदा शुन्य टक्के खर्च झाला या सर्व ग्रामसेवकांवर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. 2016-17 वर्ष संपत आले तरी वर्षभरातील चार हजार कामे अजून सुरूच झालेली नाहीत हे पाहून एसएओ (अधीक्षक कृषी अधिकारी) झोपा काढतात का? असा संतप्त सवाल भापकरांनी केला. विभागीय आयुक्त पहिल्यादांच जिल्ह्यात आल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये उत्साह होता, पण भापकरांनी खरडपट्टी 
केल्याने कार्यशाळा संपल्यानंतर सगळ्याच अधिकाऱ्यांचे चेहरे पडले होते. 
 
संबंधित लेख