bhanudas kotkars bail granted | Sarkarnama

भानुदास कोतकरला जामीन मंजूर, मात्र नगर जिल्ह्यात 'नो एन्ट्री'! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

राज्यभर गाजलेल्या केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणात अटक असलेले कॉग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर याला जिल्हा सत्र न्यायाधीश एस. व्ही. माने यांनी आज सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यासाठी नगर जिल्हा बंदीची अटही घातली आहे. 

नगर : राज्यभर गाजलेल्या केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणात अटक असलेले कॉग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर याला जिल्हा सत्र न्यायाधीश एस. व्ही. माने यांनी आज सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यासाठी नगर जिल्हा बंदीची अटही घातली आहे. 

अशोक लांडे खून प्रकरणात यापूर्वी कोतकर याने शिक्षा भोगली आहे. काही दिवसांसाठी जामीनावर बाहेर असताना केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरण घडले. त्या वेळी सुनेशी झालेल्या संभाषणावरून कोतकर यालाही आरोपी करण्यात आले. कॉल तपासणीवरून कोतकरचा केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणाशी संबंध असल्याचे सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात म्हटले आहे. 

या खटल्याची आज सुनावणी झाली. त्यामध्ये कोतकर याच्या वतीने ऍड. नितीन गवारे, ऍड. महेश तवले यांनी युक्तीवाद केला. केडगाव हत्याकांड प्रकरणात कोतकरचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. तसेच राजकीय आकसापोटी या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून जिल्हा सत्र न्यायाधीस एस. व्ही. माने यांनी कोतकर याला जामीन मंजूर केला. तसेच जिल्हाबंदी करण्यात आली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख