bhandara-charan-waghmare-sand-mafia | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

भाजप आमदाराचे वाळू तस्करांना संरक्षण?; भंडारा जिल्ह्यातील कॉंग्रेस नेत्यांचे आरोप 

श्रीकांत पनकंटीवार
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

भंडारा जिल्ह्यातील वाळू तस्करांना भाजपचे आमदार चरण वाघमारे संरक्षण देत असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. या वादामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून भाजप व कॉंग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. 

भंडारा  : भंडारा जिल्ह्यातील वाळू तस्करांना भाजपचे आमदार चरण वाघमारे संरक्षण देत असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. या वादामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून भाजप व कॉंग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. 

कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी वाळूचोरी करणाऱ्या वाळूमाफियांसोबत आमदार वाघमारे यांचे संगनमत तर नाही ना, अशी शंका व्यक्त करीत दोषी भाजप पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. सध्या या आरोपामुळे भाजप-कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली आहे. 

मोहाडी तालुक्‍यातील रोहाजवळ वाळूतस्करांनी पोलिस पथकावर हल्ला करून तिघांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी दोषी असलेले भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी अजूनही बेपत्ता आहेत. घटनेनंतर आमदार वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांना वाळूचोरी पकडण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. पोलिस रात्रीला तिथे गेलेच कसे. त्यामुळे यांच्या मोबाईलच्या सीडीआरची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली. या मागणीवरून वाळूतस्करी करून पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना आमदार वाघमारे पाठबळ असल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्यांनी केला आहे. 

माजी खासदार नाना पटोले यांनी वाळूमाफिया व पोलिसांना हल्ला करणाऱ्या आरोपींविरोधात आवाज उठवला तर आमदार वाघमारेंना त्यांचा एवढा पुळका का यावा, हे मात्र कोडेच असल्याचे कॉंग्रेस नेते रमेश पारधी, गजानन झंझाड, माजी सभापती कलाम शेख, किरण अतकरी, डॉ. पंकज कारेमोरे, कमलाकर निखाडे, खुशाल कोसरे, राजेश हटवार, अनिल काळे यांनी केला आहे.

संबंधित लेख