bhaindar muncipal, asif shekh | Sarkarnama

राष्ट्रवादीचे डॉ.आसिफ शेख यांच्या हाती कमळ 

सुचिता रहाटे 
सोमवार, 31 जुलै 2017

मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सध्या इनकमिंग सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे निरीक्षक सरचिटणीस महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ.आसिफ शेख यांनी हातात कमळ धरले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शेख यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. शेख यांच्या भाजप प्रवेशामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. 

भाजपच्या विकासाच्या प्रयत्नात डॉ.आसिफ शेख यांची साथ लाभल्यास त्यांच्या अनुभवाचा फायदा होऊन अधिक व्यापक काम करता येईल, या हेतुने आम्ही त्यांचे पक्षात स्वागत करत असल्याचे आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितले.  

संबंधित लेख