bhaiji josh support maratha | Sarkarnama

मराठा आंदोलनात असामाजिक तत्वे : भैय्याजी जोशी 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

नागपूर ः हिंसक झालेल्या मराठा आंदोलनात असामाजिक तत्वे घुसली असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न चर्चेतून सोडवावा, हिंसा हे कोणत्याही समस्येला उत्तर होऊ शकत नसल्याचे भैय्याजी जोशी यांनी म्हटले आहे. 

काही दिवसांपूर्वीच महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनात असामाजिक तत्व घुसले असल्याचे विधान केले होते. यावरून मराठा समाजात असंतोष पसरला होता. या विधानावरून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या विधानाबाबत अखेर चंद्रकांत दादा पाटील यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. या वादावर आता रा. स्व. संघाचे भैय्याजी जोशी यांनी मत व्यक्त केले आहे. 

रा. स्व. संघाच्या "सेवा दर्शन' कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना या आंदोलनाचे राजकारण होत आहे काय ? यावर त्यांनी दिले नाही. परंतु कोणताही प्रश्‍न सोडविण्यासाठी चर्चा हेच उत्तर आहे. हिंसेतून प्रश्‍न सुटू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आषाढी एकादशीला पंढरपूरला दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न रा. स्व. संघ करणार असल्याचे आरोप संभाजी ब्रिगेडच्या काही नेत्यांनी केले होते. या पार्श्‍वभूमीवर संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या विधानाला महत्त्व दिले जात आहे. 

संबंधित लेख